{"product_id":"lokshahi-prakriya-va-jatisanstha","title":"लोकशाही प्रक्रिया व जातिसंस्था | Lokshahi Prakriya Va Jatisanstha","description":"\u003cp\u003e‘लोकशाही प्रक्रिया व जातीसंस्था’ हा एक क्लिष्ट व गुंतागुंतीचा विषय आहे. या विषयाची मांडणी, चर्चा ही अनेक शतकापासून सुरू आहे. प्रस्तुत ग्रंथात लोकशाही संकल्पनेचा विस्तृतपणे उहापोह करण्यात आला आहे. लेखकाने आपल्या पहिल्या भागात जागतिक लोकशाही व संविधानाची वाटचाल आजच्या परिप्रेक्षात मांडले आहे. जागतिक लोकशाहीसह प्राचीन भारतीय लोकशाहीचे विवेचन करतांना प्राचीन गणराज्याचा उहापोह अथवा वैचारिक धांडोळा प्रस्तूत ग्रंथाचे महत्वाचे वैशिष्ट्ये आहे. प्रस्तुत ग्रंथाच्या दुसर्‍या भागात चर्चा करतांना जातीसंस्थेचे स्वरुप अभ्यासतांना अगदी वैदीक कालखंडापासून आधुनिक कालखंडापर्यंतचा जातीसंस्थेचा प्रवास व त्याचे समाज जीवनातील स्थान रेखाटले आहे. प्रस्तुत ग्रंथात जातिचा विविध अंगाने विचार करणारे आणि जातिव्यवस्था संविधाना अंतर्गत कश्यारितीने बदलत आहे, या संबंधीचा तटस्थ अभ्यास प्रस्तुत ग्रंथाचे गुणवैशिष्ट्ये आहे. भारतात जात हा विषय शुद्धतेच्या तत्वाशी जोडला जातो. अशावेळी आदर्श समाज जीवनाचा एक उत्तम नमुना म्हणून याकडे कसे पाहता येईल? म्हणून लेखकाने प्रस्तुत ग्रंथात केलेले विवेचन आशय विश्लेषण हे वैचारिक विवेकशील व अनेकांशी जोडणारी आहे.\u003c\/p\u003e","brand":"Atharva Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":68281397411923,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Lokshahi_20Prakriya_20v_20Jatisansstha_20front.jpg?v=1795505177","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/lokshahi-prakriya-va-jatisanstha","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}