{"product_id":"madhyayugin-bharatacha-itihas-i-sa-1206-te-1707","title":"मध्ययुगीन भारताचा इतिहास (इ.स.१२०६ ते १७०७) | Madhyayugin Bharatacha Itihas (I.Sa.1206 Te 1707)","description":"\u003cp\u003eमध्ययुगीन भारताचा इतिहास (इ. स. १२०६ - इ. स. १७०७) या ग्रंथाची मांडणी अगदी सोप्या, सुटसुटीत आणि मुद्देसुद भाषेत केलेली आहे. प्रस्तुत ग्रंथात मध्ययुगीन भारताच्या इतिहासाची साधने यामध्ये शिलालेख, नाणी, विविध भाषेतील ग्रंथ आणि वैशिष्ट्य म्हणजे मौखिक भाषेतील साधनांचा तसेच राजस्थानी साधनांचाही नव्याने समावेश केलेला आहे. भारतात मुस्लिमांच्या आक्रमणाचा इतिहास, त्यांच्या सत्तास्थापने पासून गुलाम, खिलजी, सय्यद व लोदी सुलतान, मोगलांच्या राजकीय कारर्किदीवर प्रकाश टाकण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे बलाढ्य अशा मोगल सत्तेविरूद्ध राजपूत, शीख यांनी दिलेल्या संघर्षाची माहिती आलेली आहे. दक्षिण भारतातील विजयनगर व बहामनी या राजवटींची माहिती दिलेली असून या काळात झालेल्या विविध कलांच्या विकासाची, राजपूतांनी, मराठ्यांनी बांधलेल्या किल्ल्यांची व त्यांच्या वैशिष्ट्यांची माहिती आलेली आहे. निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही व मराठे या स्वतंत्र सत्तांनी मोगल सत्तेशी केलेल्या संघर्षाची माहिती ही आलेली आहे. त्याचबरोबर धार्मिक बाबतीत भक्ती चळवळ व सूफी संप्रदाय, वारकरी चळवळीची व त्यातील संतांच्या कामगिरीची माहिती ही आलेली आहे.\u003c\/p\u003e","brand":"Atharva Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":68281399345235,"sku":"9.78936E+12","price":455.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Madhyayugin_20Bharatacha_20Etihas_201206-1707_20front.jpg?v=1795505219","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/madhyayugin-bharatacha-itihas-i-sa-1206-te-1707","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}