महाराष्ट्राच्या औद्योगिक आणि सामाजिक जीवनात आदराने उच्चारले जाणारे एक नाव - आबासाहेब गरवारे ! एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या भालचंद्र दिगंबर गरवारे यांनी आपल्या अथक परिश्रमाने, जिद्दीने आणि दूरदृष्टीने उद्योगजगतात अतुलनीय यश संपादन केले. प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षणाचा ध्यास घेतलेले आणि कोणतीही गोष्ट मनोभावे व पूर्ण समर्पणाने करण्याची वृत्ती बाळगणारे आबासाहेब त्यांच्या जीवनाची ही गाथा निश्चितच प्रेरणादायी आहे. केवळ व्यावसायिक यशच नव्हे, तर समाजाप्रती त्यांनी जपलेली बांधिलकीही तितकीच अद्वितीय आहे. आज आबासाहेब गरवारे हे नाव केवळ यशस्वी उद्योजक म्हणून नव्हे, तर विचारवंत, द्रष्टे समाजसेवक आणि प्रेरणादायी जीवनमूल्यांचे प्रतिनिधी म्हणून ओळखले जाते.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours