प्रस्तुत पुस्तकात सामाजिक व राजकीय चळवळीत सत्यशोधक चळवळ, दलित चळवळ, आदिवासी चळवळ, समकालीन चळवळ याविषयीचे सविस्तर विवेचन केलेले आहे. साध्या, सोप्या भाषेत, मुद्देसूदपणे ठळक बाबींच्या नोंदीसह लेखन केलेले आहे. महात्मा फुले आणि सत्यशोधक चळवळ यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. जन्मजात उच्च-नीचतेच्या कल्पनांवर आधारलेल्या जाती संस्थेचा व चातुर्वण्यव्यवस्थेचा महात्मा फुलेंनी व सत्यशोधक चळवळींनी धिक्कार केला. १९ व्या शतकाच्या प्रारंंभी जाचक बंधनातून समाजातील शूद्र समजल्या गेलेल्या वर्णाची सुटका व्हावी, सामाजिक समानता व न्याय प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने दलित चळवळ उदयास आली. आज भारतीय समाजरचनेप्रमाणेच महाराष्ट्रातही स्पृश्यास्पृश्यभेद तसेच आदिवासी यांचेही स्तर येथील समाजरचनेत आहे. रूढी, परंपरेचा प्रभाव, अंधश्रध्देवर विश्वास, वैवाहिक स्वातंत्र्य यासह विविध परिस्थितीवर मात करण्यासाठी आदिवासी चळवळ विकसित झाली. आजचा काळ हा विज्ञान-तंत्रज्ञान, औद्योगिकीकरण, उदारीकरण, माहिती-तंत्रज्ञान आणि जागतिकीकरणाचा आहे. या प्रक्रियांमुळे शिक्षण, अर्थव्यवस्था, पर्यावरण, स्त्री-पुरुष संबंध, जातीभेद, लोकशाही आणि सामाजिक न्याय या क्षेत्रांत अनेक नवे प्रश्न उभे राहिले आहेत. त्यांना उत्तर शोधण्यासाठी विविध समकालीन चळवळी पुढे आल्या आहेत.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours