{"product_id":"mahipaticha-goshtiroop-bhaktvijay-by-b-d-kher","title":"MAHIPATICHA GOSHTIROOP BHAKTVIJAY| महिपतीचा गोष्टीरूप भक्तविजय By B. D. KHER| भा. द. खेर","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eभा. द. खेर यांनी या पुस्तकात महिपती रचित ‘भक्तविजय’ या ग्रंथातील ओवीबद्ध संतचरित्रे गोष्टीरूपाने समाविष्ट केली आहेत. अलौकिक काव्यऊर्मी असलेले बहुश्रुत महीपती तुकारामांना गुरू मानत असत. तुकारामांनी स्वप्नदृष्टान्त देऊन त्यांना संतचरित्रे शब्दबद्ध करण्यास उद्युक्त केले. तब्बल बारा वर्षे महीपतींची लेखणी अविश्रांतपणे स्रवत होती. त्यातून ग्रंथरूपाने उदंड काव्यसंपत्तीची निर्मिती झाली. महीपतींनी ‘भक्तविजय’, ‘संतलीलामृत’, ‘संतविजय’, ‘कथासारामृत’ इत्यादी रसाळ आणि भक्तिरसपूर्ण ग्रंथ लिहिले. लेखकाने ‘भक्तविजय’ ग्रंथातील मूळ काव्यमय असलेल्या चोवीस अध्यायांतील सव्वीस संतांची चरित्रे गोष्टीरूपाने साध्यासोप्या प्रवाही भाषेत वर्णिली आहेत. या संतांनी आबालवृद्धांना धर्म, नीती आणि व्यवहार याचे शिक्षण देत त्यांना भक्तिमार्गाला लावले. सदाचार-विचार, सद्भाव आणि सर्वांभूती समभाव यांची शिकवण दिली. अशा पुस्तकाच्या वाचनाने आपल्या अभिजात श्रद्धेला भक्तीचा मोहर येतो आणि आपण आराध्य दैवतापुढे लीन होतो...\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":67598853308499,"sku":null,"price":342.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/718nJOruE_L._SL1500.jpg?v=1791183389","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/mahipaticha-goshtiroop-bhaktvijay-by-b-d-kher","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}