Skip to product information
मह्य आंगन | Mahy Aangan
Rs. 175.00
Pages: 80
Language: Marathi

कवयित्री सुनिता प्रकाश येवले यांचा ‘मह्य आंगन’ हा कवितासंग्रह वाचतांना मी हे सर्व पाहिलं आहे, हे असं मी अनुभवलं आहे आणि अशा प्रकारचं मीही जगला आहे, याचा प्रत्यय सतत येत राहतो. खेडेगावातून शहरात स्थायिक झालेल्या अनेकांच्या मनातून आपल्या भूतकाळातला गाव जात नाही; अजूनही मनाच्या कोपर्‍यात तो जीवंत असतो आणि त्या रम्य आठवणी जगण्यासाठी उर्जा देत राहतात. निसर्गाच्या लहरीवर अवलंबून असणारी शेती, संकटांशी दोन हात करत ऊन, वारा, पावसाशी झगडत शेती कसणारा-धान्य पिकवणार्‍या, साध्या भोळ्या मनाच्या शेतकर्‍याबद्दल कवयित्रीच्या मनात निंतात आदर आहे. तसंच ग्रामीण जीवनाबद्दल अपार ओढ आहे. जुन्या काळातील घरगुती वापरातल्या वस्तुंची भावचित्रं कवयित्रीनं सुंदर उभी केली आहेत. सण, उत्सव, जत्रा, शेती-मातीतले, रानावतले आनंददायी प्रसंग नेमक्या शब्दातून प्रभावीपणे मांडले आहेत. खानदेशी खाद्यसंस्कृतीबद्दल त्यांच्या मनात कमालीची आसक्ती आहे. ग्रामीण जीवनाचं सूक्ष्म निरीक्षण कवितेच्या ओळीओळीतून उतरताना दिसतं. पूर्वी खेडेगावात लोक समूहानं जगत होते, गावातील बारा बलुतेदार, पारंपरिक भटके-कलावंत सर्वांना आसरा मिळत होता. जातीपातीच्या पलीकडे जाऊन दिला घेतला जाणारा वानोळा हे ग्रामीण जीवनाचं वैशिष्ट्य होतं. पण हल्ली खेडी बदलत चालली आहे. आता दारासमोरचं ते विशाल आंगन संकोचलं आहे. धान्य साठवण्याचे ते मोठ्ठाले पेव काळाच्या उदरात गडप झाले आहेत. वाड्यातल त्या घेरदार कठग्या अस्तंगत झाल्या आहेत. त्याचबरोबर खुल्या मनाची माणसंही कुठे दिसनाशी झाली आहे. - प्रा. किसन वराडे, अंबरनाथ (मुंबई)

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

मह्य आंगन | Mahy Aangan

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like