Skip to product information
Maitree Bankingshe - 13th Edition
Sale price  Rs. 405.00 Regular price  Rs. 450.00
Pages: 208
Language: Marathi
Overview:
मैत्री बँकिंगशी म्हणजे भारतीय बँकिंग व्यवसायाच्या मार्गक्रमाचा संदर्भग्रंथ आहे. तेरावी आवृत्ती वाचकांना नव्या दृष्टिकोनातून बँकिंग जगतातील माहिती देईल. बँकिंग व्यवस्थेतील विविध आधुनिक आणि पारंपरिक घटकांचे अभ्यासपूर्ण स्पष्टीकरण सर्व सामान्यांसाठी बँकिंग विषयांची गुंतागुंतींची संकल्पना सोप्या भाषेत उलगडली आहे. प्रत्येक प्रकरण व्यावहारिक दृष्टिकोनातून सखोल मांडलेले असून, आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल स्पष्टता दिलेली आहे. हे केवळ तांत्रिक माहितीवर आधारित नसून, बँकिंग व्यवहारातील मानवी संबंधांचे महत्त्वही अधोरेखित करते. ग्राहकांसोबतच्या दीर्घकालीन संबंधांना प्रोत्साहन देणारी बँकिंग प्रणाली म्हणजेच मैत्री बँकिंग संकल्पना अधिक सखोलपणे समजावली आहे. बँकेत येऊ इच्छिणारे, बँक ग्राहक, बँकिंग अभ्यासक यांच्या बरोबरच बँक व्यवस्थापन, बँक कर्मचारी, अधिकारी, प्रशिक्षण संस्था, प्रशिक्षणार्थी, विद्यार्थी , शिक्षक, लहानमोठे ज्येष्ठ, महिला वर्ग व इतरेजन अशा सर्वांना मार्गदर्शक. विद्यार्थी, शेतकरी, कलाकार, प्रशिक्षण देणारे व घेणारे, संचालक, सभासद, अनेकविध क्षेत्रातील कर्मचारी-वर्ग , व्यावसायिक, स्त्रीवर्ग, ज्येष्ठ-कनिष्ठ अशा सर्वांना उपयुक्त ‘अनिवासी भारतीय’, ‘शैक्षणिक कर्ज’, ‘सूक्ष्म लहान व मध्यम उद्योग’ ‘वित्तीय समावेशन’ अशी अनेक; यामुळे ग्रामीण आणि शहरी बँकिंगच्या सर्व स्तरांवरील मुद्दे पुस्तकात समजावून सांगितले आहेत. शेतीकर्ज आणि शेतीला वित्तसाहाय्य यांसारख्या महत्त्वाचा विषयांवर मांडणी उत्तमरीत्या केली आहे. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Book cover type

You May Also Like