Skip to product information
माझे जीवन माझा मार्ग - डॉ. ए. व्ही. रामा राव | Majhe Jeevan Majha Marg - Dr. E. Vhi. Rama Rav
Sale price  Rs. 338.00 Regular price  Rs. 450.00
Pages: 200
Language: Marathi

शास्त्रज्ञ, संशोधक आणि तंत्रज्ञानदृष्ट्या स्वयंपूर्ण भारताचे स्वप्न पाहणाऱ्या डॉ. ए. व्ही. रामा राव यांच्या "My Life, My Way" या इंग्रजी आत्मचरित्राचे "माझे जीवन, माझा मार्ग" हे मराठी रूपांतर वाचकांपर्यंत पोहोचत असल्याचा हा एक आनंदाचा क्षण आहे. हे आत्मचरित्र केवळ वैयक्तिक वाटचालीचे वर्णन नसून, भारतीय विज्ञानातील संघर्ष, प्रयोग, नवकल्पना, धोरणनिर्मिती आणि तंत्रज्ञान हस्तांतरण यांचे अद्वितीय दस्तऐवजीकरण देखील आहे. या आत्मचरित्राचे वैशिष्ट्य म्हणजे शास्त्रीय संशोधनाकडे पाहण्याची अपरंपरागत आणि साहसी दृष्टी. संशोधन म्हणजे फक्त प्रयोगशाळेतील साधने, यंत्रे किंवा क्रियापद्धती नसून त्यामागे एक बंडखोर शोधभाव, धैर्य, कठोरता आणि हार न मानण्याची वृत्ती असते हे या आत्मकथनातून स्पष्ट होते. भारतात रासायनिक विज्ञान, औषधनिर्मिती, औद्योगिक प्रक्रिया, पेटंट, ट्रान्सफर ऑफ टेक्नॉलॉजी इत्यादी क्षेत्रांत घडलेल्या महत्त्वपूर्ण घडामोडींच्या प्रत्यक्ष अनुभवातून लिहिलेले हे साहित्य संशोधक आणि विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरेल. या इंग्रजी आत्मकथनाचे मराठीत भाषांतर करण्याचा मान राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे येथील निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. हनुमंत बोराटे यांना लाभला आहे. इंग्रजीतील रसायनशास्त्रीय, तांत्रिक, औद्योगिक आणि संशोधनविषयक संज्ञांना मराठीतील सुयोग्य पर्याय शोधून किंवा गरजेनुसार आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक संज्ञांचा अचूक वापर करून डॉ. बोराटे यांनी हे काम भाषिक संवेदनशीलता, तांत्रिक सुस्पष्टता आणि वाचनसुलभता यांचा योग्य मेळ साधत अत्यंत प्रभावीपणे पार पाडले आहे. मराठी वाचकांसाठी ही एक महत्त्वपूर्ण घटना आहे. डॉ. रामाराव यांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे शिस्त, दृष्टिकोन, जिद्द आणि वैज्ञानिक कल्पकतेची एकत्रित कहाणी. त्यांच्या वाटचालीतून "कल्पना प्रयोग उत्पादन तंत्रज्ञान समाजहित" हा अखंड प्रवास स्पष्ट होतो. अशा प्रकारचे साहित्य तरुणांना "विज्ञान म्हणजे धैर्य" हे शिकवते. मराठी रसिक वाचकांनी हे आत्मकथन कुतूहलाने, विचारशीलतेने आणि प्रेरणादायी दृष्टीने वाचावे, एवढीच अपेक्षा! डॉ. माणिकराव माधवराव साळुंखे माजी कुलगुरु, भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय, पुणे

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

माझे जीवन माझा मार्ग - डॉ. ए. व्ही. रामा राव | Majhe Jeevan Majha Marg - Dr. E. Vhi. Rama Rav

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like