आपले किती जन्म होऊन गेले, कुणी मोजलेत ?
प्रत्येकाची वाटचाल मात्र सुरू आहे.
किती चालायचं? कुठे जायचं? का जायचं?
हे सगळे प्रश्न अनुत्तरित राहणार का ?
वाटेवर पडणारं प्रत्येक पाऊल पावलागणिक जे जे अनुभव घेतं, ते सगळेच अनुभव मांडून दाखवता येत नाहीत.
कितीवेळा मातीत नाळ पुरून मातीतूनच पुन्हा जन्म घ्यायचा??
भूमितीतली ही मिती सापडत नाही आणि जगण्याचं गणित सुटता
सुटत नाही.
वरलिया रंगाला भुललेल्या करोडो वाटसरूंचं चालणं संपवणारी अवघड, अनघड असूनही मुक्कामाला पोहोचणारी वाट दाखवणारा वाटाड्या जरी भेटला, तरी त्या वाटाड्याला अनेक किंतु, पण, परंतु मध्ये वर्ग करण्यातच वाटसरूंना धन्यता वाटते. त्याला नाकारणं, तर फार सोपं असतं, कारण वाट बदलणं मानवत नाही !
झेपत तर त्याहूनही नाही! म्हणूनच जन्मांतरीची गोष्ट संपत नाही. वाट कोणतीही असो, तिथल्या प्रत्येक टप्प्यावर
आयुष्याचा कस लागतो.
जगणं हे एका अर्थी जीवघेणा खेळ जरी असला, तरी वाटचाल संपवायची की जन्मोजन्मी सुरूच ठेवायची, हा निर्णय तुमचा आहे. सर्वस्वी तुमचा !!!
Pickup available at HO
Usually ready in 24 hours