{"product_id":"manoos-asa-ka-vagato-by-anjali-chipalkatti","title":"माणूस 'असा' का वागतो ? | Manoos 'asa' ka vagato ? By Anjali Chipalkatti | अंजली चिपलकट्टी","description":"\u003cp\u003eनैतिकता अन् सामाजिक विषमता, धर्मभावना आणि आध्यात्मिकता, प्रेम अन् लैंगिकता, आक्रमकता अन् भय, अनुपालन, धर्म-जात भेदाभेद, कल्पनाविश्व अन् साहित्य-कला-क्रीडा... माणसाच्या वर्तनाचे असे अनेकविध पैलू. उत्क्रांतिशास्त्र, मानववंशशास्त्र, भाषाशास्त्र, जेनेटिक्स, मेंदूविज्ञान, मानसविज्ञान, प्राणीवर्तनविज्ञान अशा विविध ज्ञानशाखांच्या मिलाफातून माणसाच्या वर्तनाचा अभ्यास चालू आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eस्वत:चे सांस्कृतिक पर्यावरण घडवण्याची क्षमता असलेला एकमेव प्राणी म्हणजे माणूस. सहकार्य, परोपकार, साहचर्य हे गुण माणसाच्या उत्क्रांतीत महत्त्वाचे ठरले आहेत. माणसांना एकमेकांशी बांधणारी तत्वं माणसाच्या वर्तनात उत्क्रांतीनेच पेरली आहेत का ?\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eमानवी वर्तनाला विधायक वळण देण्याची अंगभूत क्षमता माणसातच आहे का ? अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरांचा मागोवा घेणारे - आजच्या सामाजिक-राजकीय-आर्थिक परिस्थितीशी नानाविध ज्ञानशाखांच्या एकात्मिक अभ्यासाचा संबंध जोडत माणसाच्या व्यक्तिगत अन् सामूहिक वर्तनाचा वैज्ञानिक वेध घेणारे – माणूस असा का वागतो ? हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"Rajhans Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270314160211,"sku":null,"price":650.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/cover_original_b0a3a993-c088-4e88-b660-9fa44d3876eb.webp?v=1759041561","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/manoos-asa-ka-vagato-by-anjali-chipalkatti","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}