{"product_id":"manus-ani-man-माणूस-आणि-मन-by-dr-sanyogita-nadkarni-डॉ-संयोगिता-नाडकर्णी","title":"Manus ani Man|माणूस आणि मन By Dr. Sanyogita Nadkarni|डॉ संयोगिता नाडकर्णी","description":"\u003cp\u003eमाझं चुकतंय का?\u003cbr\u003eहा अहंकार आहे का?\u003cbr\u003eमाझी चूक नसताना मी का ऐकून घेऊ?\u003cbr\u003eमला नाही जमत, काय करू?\u003cbr\u003eशेवटी माझ्याकडेच यावं लागलं ना!\u003cbr\u003eरागावल्याशिवाय कामं होत नाहीत.\u003cbr\u003eयांना धडा शिकवल्याशिवाय कळणार नाही\u003cbr\u003eमीच नेहमी का सहन करायचं?\u003cbr\u003eहोत कसं नाही... झालंच पाहिजे!\u003cbr\u003eलोक काय म्हणतील?\u003cbr\u003eमला काही फरक पडत नाही!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमी मी आणि मी! मीला सावरता येत नाही आणि आवरताही येत नाही... मीचं काही करता येत नाही, पण मीचं कोडं सुटलशिवाय पुढं जाताही येत नाही!\u003cbr\u003eकोडं सुटणार कसं? मी कळला, तर कोडं सुटेल. मी कळेल कसा? मी कळवून घेण्यासाठीच हा पुस्तक प्रपंच! पण ‘प्रपंच’ म्हटल्याने घाबरून जाऊ नका. तो आपल्या मनाच्या गुंत्याइतका अवघड नाही. उलट गुंता सोपा करणारा आहे.\u003cbr\u003eकिचकट संज्ञा आणि कठीण आकृत्या म्हणजे मन नाही... आपलं वागणं म्हणजे आपलं मन! आपल्यासारखी वागणारी, विचार करणारी आणि रागावणारीसुद्धा माणसं आपल्याला या पुस्तकात भेटतील... अगदी आपण आपल्यालाच  भेटू तशी!\u003cbr\u003eआणि ती तशी का वागतात... खरंच ती मुळातून (की आपण) भित्री, चिडकी, बेरड, लबाड, नीरस असतात का? पृथ्वीच्या पोटाप्रमाणे मनाच्याही पोटात स्वभावाची काही रहस्यं दडली आहेत का? आणि असतील, तर ती सोडवायची कशी?\u003cbr\u003eया सगळ्या आणि याशिवाय इतरही अनेक प्रश्नांची उत्तरं आणि स्वत:ला समजून घेण्याचे साधे-सोपे मार्ग आपल्याला या पुस्तकात भेटतील. ते आपल्याला चूक-बरोबर ठरवणारे नाहीत; उलट मित्रासारखे मन हलकं करणारे आहेत.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":45193472311379,"sku":null,"price":360.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/1174-manusmancoverdesignfrontl_1024x1024_2x_e93b037a-8aae-4de3-b4b6-07103dc3fb30.jpg?v=1780469863","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/manus-ani-man-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a5%82%e0%a4%b8-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%ae%e0%a4%a8-by-dr-sanyogita-nadkarni-%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%af%e0%a5%8b%e0%a4%97%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%a1%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a3%e0%a5%80","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}