{"product_id":"marco-pollo","title":"Marco Polo : Europe Aani Asiala Jodnara Sahasi Pravasi | मार्को पोलो : युरोप आणि एशियाला जोडणारा साहसी प्रवासी","description":"\u003cp\u003eव्यापार आणि प्रवास करताना त्याने अनेक संकटांना आणि खडतर आव्हानांना तोंड दिले. अनेक वाहनांचा, साधनांचा वापर करून त्याने रस्ते, वाळवंट आणि समुद्र यांतूनदेखील प्रवास पूर्ण केला. व्हेनिससारख्या युरोपीय नगरातून बीजिंग, नानकिंग, जावा, सुमात्रा, मलाया, व्हिएतनाम, सिलोन करत भारतालादेखील त्याने भेट दिली.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eहजारो मैलांचा प्रवास करताना हा साहसवीर एक आश्चर्यकारक जीवन जगला. त्याच्या या प्रवासाचीच ही कथा. युरोप आणि आशिया या दोन्ही खंडांची एकमेकांशी ओळख करून देणाऱ्या मार्को पोलो या साहसी प्रवाशामुळे युरोपाला एका नव्या जगाचा परिचय झाला. विविध प्रदेशात फिरताना त्याने अनेक भाषा आत्मसात केल्या.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eमार्को पोलोच्या प्रवासातील अद् भुत घटना, रोमहर्षक प्रसंग, त्या काळातील लढाया, राज्यांची आणि राज्यकर्त्यांची वर्णने वाचण्यासाठी, त्या काळचा अनुभव घेण्यासाठी वाचायलाच हवं असं पुस्तक. लेखकाविषयी : संजय कप्तान यांनी व्यवस्थापन व वाणिज्यविषयक, विज्ञान व तंत्रज्ञान, चरित्र असं विविध प्रकारचे लेखन केले आहे. जेन गुडाल, मेरी क्युरी, लिओनार्दो, विज्ञानवेत्ता न्यूटन, व्यवस्थापन बोध, गुणवत्ता संस्कृती अशी त्यांची विविध पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. हे मराठी चरित्र वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270541078611,"sku":null,"price":144.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Book_Cover_Marco_Polo__Front.jpg?v=1773661753","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/marco-pollo","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}