Skip to product information
मिरार्थ | Mirarth
Rs. 195.00
Pages: 104
Language: Marathi

श्रीमती मिराबाई रामलाल आढाव यांना बहिनाईची लेक म्हणून संबोधलं जातं. संत सखाराम महाराज यांच्या पुनीत स्पर्शाने पावन झालेल्या अमळनेर नगरीच्या त्या सुकन्या तर झाशीची राणी लक्ष्मीबाईंचे माहेरघर असलेल्या पारोळा नगरीच्या स्नुषा. १९५० साली कै. देवाजी नारायण वखारे व कै. भागाबाई यांच्या पोटी त्या जन्मल्या. त्या काळातील जुन्या मॅट्रिकपर्यंत शिक्षण अमळनेर येथे झाले. ३ फेब्रुवारी १९६९ रोजी कै. रामलाल रंगो आढाव यांच्याशी विवाहबद्ध होऊन त्या पारोळ्यात आल्या. पतीच्या रूपाने जीवन घडविणारा शिक्षक त्यांच्या जीवनी दीपस्तंभ बनून राहिला. मिराबाई लहानपणापासूनच कलासक्त आणि माणूसवेडी माणसं जोडण्याचं कौशल्य आणि त्याचं सुख दुःख समजून घेणार संवेदनशील मन आणि काव्यप्रतिभेची जन्मजात देणगी यामुळे काव्य स्फूर्तपणे गाण्याच्या रूपातून प्रकटू लागलं. नोकरीच्या निमित्ताने खेडोपाडी वास्तव्य झालं आणि जनजीवन जवळून न्याहाळत आल. सरस्वतीच्या वरदहस्ताने मनातील भावना स्फूर्तपणे वाणीतून स्ववू लागल्या. छोट्या मोठ्या प्रसंगी कधी आनंदाची, कधी कौतुकाची तर कधी दुःखाची गाणी. पण लिहिलेल्या कविता प्रकाशित करायला प्रपंचाच्या धावपळीत वेळ मिळाला नाही. आता आयुष्याच्या सायंकाळी मुलगा-सून यांनी सर्व जवाबदारी सांभाळली. निवांतपणा मिळाला. भजनी मंडळाच्या निमिताने काव्यरचना आणि गायनाला गती मिळाली. नवीन काव्यरचना स्फुरल्या. आणि मग नातवंडांच्या आग्रहाने हा कवितासंग्रह साकारला. उदाल विचार, सहज, ओघवती भाषाशैली, चपखल आणि सौंदर्यपूर्ण शब्द योजना शब्दांची नादमय मांडणी ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये. मिष्कीलपणा आणि खुसखुशीत विनोदही त्यातून डोकावतो. बालकाव्य तर मन मोहून टाकते. मराठी, हिंदी आणि अहिराणी भाषेत अस्सखलीतपणा आणि सहजता आहे. वाचता, ऐकता सहज आवडावी अशी त्यांची

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

मिरार्थ | Mirarth

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like