{"product_id":"molachi-thev","title":"Molachi Thev | मोलाची ठेव","description":"\u003cp\u003e‘मोलाची ठेव’ या कृष्णा पाटील यांनी लिहिलेल्या कथासंग्रहात साधारण २५ कथा आहेत. लेखकाने मनोगतात म्हटल्याप्रमाणेत्यांना स्वतःला एक वाचक म्हणून काल्पनिक आणि अद्भुत जगाच्या कथांमध्ये रस नाही.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eत्यामुळे या संग्रहातील कथांमध्ये अतिशय कमी काल्पनिक अंश असून यातील सर्व कथा या बहुतकरून लेखकाला आलेले अनुभव, पाहिलेल्या वा भेटलेल्या व्यक्ती, अनुभवलेले प्रसंग यातून जन्माला आल्या आहेत. ‘मोलाची ठेव’ हा लेखक कृष्णा पाटील यांचा दुसरा कथासंग्रह असून लेखकाने आपल्या अनुभवसमृद्ध जगण्यातून या कथा शब्दबद्ध केल्या आहेत.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eया कथा आपल्या आजूबाजूला असलेल्या माणसांच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडीतून जन्म घेत असल्याने समकालीन समाजजीवनाचा एक कथारुपी दस्तऐवजच यातून तयार होतो आहे. सत्य प्रसंगातून आणि अनुभवातून जन्माला येणाऱ्या अशा प्रकारच्या कथा ज्यांना आवडतात त्यांच्यासाठी हा कथासंग्रह म्हणजे एक पर्वणी आहे. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270549074003,"sku":null,"price":206.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/MolachiThev-FrontCover.jpg?v=1773818431","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/molachi-thev","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}