कशी आहे बुवा ही अमेरिका ? …. कोणत्याही देशात थोड्या दिवसांसाठी जायचं असो वा दीर्घ वास्तव्यासाठी … त्या देशाचा राजकीय इतिहास जाणून घेतला , तेथील शिस्त , रीतिरिवाज , पद्धती , तेथील बोली भाषा समजून घेतल्यास आपलं वास्तव्य सुखकर तर होतंच पण त्याचबरोबर आपण अधिक अनुभवसंपन्न होऊ शकतो . त्या दृष्टीने डॉ . मोहन द्रविड यांनी त्यांच्या ४०-४५ वर्षांच्या अमेरिकेतील वास्तव्यात अनुभवलेली अमेरिका रंजकपणे आणि अतिशय सहजसुंदर शैलीतून या पुस्तकाद्वारे उलगडून दाखवली आहे . या पुस्तकात अमेरिकेचं काय चांगलं , काय वाईट याची चर्चा केली नसून लेखकाने अमेरिकेची सर्वांगीण ओळख करून दिली आहे . अमेरिकेचा संक्षिप्त इतिहास , तिथलं राजकारण , दैनंदिन जीवन , समाज जीवन , लोकांची कामाची पद्धत , कुटुंबव्यवस्था , सणवार सुट्ट्या , भाषा अशा अनेक पैलूंचा अंतर्भाव लेखकाने या पुस्तकात अभ्यासपूर्णरीत्या केला आहे . आज भारतातून शिक्षणासाठी , नोकरी – व्यवसायासाठी , पर्यटनासाठी किंवा आपल्या पाल्यांना अथवा नातेवाईकांना भेटण्यासाठी अमेरिकेत जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे . अशा सर्वांसाठी एक सच्चा सोबती … मुक्काम पोस्ट अमेरिका !
Pickup available at HO
Usually ready in 24 hours