{"product_id":"mukkam-post-america","title":"मुक्काम पोस्ट अमेरिका | Mukkam post America","description":"\u003cp\u003eकशी आहे बुवा ही अमेरिका ? …. कोणत्याही देशात थोड्या दिवसांसाठी जायचं असो वा दीर्घ वास्तव्यासाठी … त्या देशाचा राजकीय इतिहास जाणून घेतला , तेथील शिस्त , रीतिरिवाज , पद्धती , तेथील बोली भाषा समजून घेतल्यास आपलं वास्तव्य सुखकर तर होतंच पण त्याचबरोबर आपण अधिक अनुभवसंपन्न होऊ शकतो . त्या दृष्टीने डॉ . मोहन द्रविड यांनी त्यांच्या ४०-४५ वर्षांच्या अमेरिकेतील वास्तव्यात अनुभवलेली अमेरिका रंजकपणे आणि अतिशय सहजसुंदर शैलीतून या पुस्तकाद्वारे उलगडून दाखवली आहे . या पुस्तकात अमेरिकेचं काय चांगलं , काय वाईट याची चर्चा केली नसून लेखकाने अमेरिकेची सर्वांगीण ओळख करून दिली आहे . अमेरिकेचा संक्षिप्त इतिहास , तिथलं राजकारण , दैनंदिन जीवन , समाज जीवन , लोकांची कामाची पद्धत , कुटुंबव्यवस्था , सणवार सुट्ट्या , भाषा अशा अनेक पैलूंचा अंतर्भाव लेखकाने या पुस्तकात अभ्यासपूर्णरीत्या केला आहे . आज भारतातून शिक्षणासाठी , नोकरी – व्यवसायासाठी , पर्यटनासाठी किंवा आपल्या पाल्यांना अथवा नातेवाईकांना भेटण्यासाठी अमेरिकेत जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे . अशा सर्वांसाठी एक सच्चा सोबती … मुक्काम पोस्ट अमेरिका !\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":68232531345491,"sku":"978-93-82591-26–9","price":206.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/MukkamPost-AmericaFront-1.jpg?v=1795070501","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/mukkam-post-america","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}