मनुष्य जीवनाचा प्रत्येक क्षण हा वेळेच्या आणि यशाच्या मागे धावण्यात जात आहे. या धावण्यात माणसाच्या स्वभावातील सहृदयता, संयम, सहिष्णुता, नम्रता, नीतिमत्ता, आदर अशा अनेक मूल्यांची गळचेपी होत चालली आहे. आपल्या जीवनशैलीत झपाट्याने झालेल्या बदलांमुळे व्यक्तिकेंद्री प्रवृत्ती वाढू लागली आहे. या व्यक्तिकेंद्री प्रवृत्तीमुळे समाजात स्वार्थ, असंवेदनशीलता, भेदभाव, भ्रष्टाचार, नैतिक अध:पतन, हिंसाचार, असहिष्णुता, सामाजिक तणाव हे घटक वाढीस लागले आहेत. पूर्वी ज्या गोष्टींना अवगुण किंवा दुर्गुण मानले जायचे, त्या आज अनेकदा व्यवहारीकता म्हणून स्वीकारल्या जात आहेत. अशा या परिस्थितीत, मूल्य शिक्षण हे केवळ उपयुक्त नव्हे, तर अत्यावश्यक ठरते. कारण शिक्षण हे फक्त नोकरीसाठी ज्ञान देणारे नसावे, तर ते जीवन जगण्याची दिशा देणारे असावे. शिक्षणाचे खरे उद्दिष्ट म्हणजे व्यक्तीच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा विकास म्हणजेच केवळ बुद्धीचे नव्हे तर हृदयाचेही शिक्षण.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours