{"product_id":"mystery-girl-sadhana-by-sunil-pande","title":"Mystery Girl Sadhana | मिस्ट्री गर्ल साधना By Sunil Pande | सुनील पांडे","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e‘सौंदर्याच्या कविते’चे सुंदर रसग्रहण\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसात्विक सौंदर्याच्या जादूने रसिकांना भारून टाकणाऱ्या अभिनेत्री साधनाची ‘मिस्ट्री गर्ल साधना’ ह्या शीर्षकाची अतिशय सुरेख अशी चरितकहाणी प्रख्यात लेखक सुनील पांडे यांनी लिहिलेली आहे. भारतीय चित्रपट सृष्टीत मधुबाला, वैजयंतीमाला, माला सिन्हा, शर्मिला टागोर यांच्यासारख्या सौंदर्यवती चित्रतारका अक्षरश: राज्य करत असताना आपल्या रसमधुर, शालीन सौंदर्य आणि कसदार अभिनयाच्या बळावर स्वत:चे असे चित्रसाम्राज्य निर्माण करणाऱ्या साधनाचे ‘सौंदर्याची कविता’ असे वर्णन साक्षात\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eपु. ल. देशपांडे यांनीच केलेले आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसाधनाची केशरचना हा एक मोठ्या चर्चेचा विषय होऊन गेला. साधनेच्या केसांना ‘साधना कट’ म्हटलं जायला लागलं. देशभरात ‘साधना कट’ लोकप्रिय झाला. लहान लहान मुलींपासून ते अगदी प्रौढ महिलाही ‘साधना कट’ करायला लागल्या. अजूनही ती फॅशन आवडीने केली जाते. अशा प्रकारची रसिकप्रियता क्वचित कुणाला लाभते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसुनील पांडे यांनी लिहिलेल्या प्रस्तुत चरितकहाणीमध्ये अभिनेत्रीच्या कसदार अभिनयाविषयी चांगली चर्चा करण्यात आलेली आहे. तिची चित्रपट कारकीर्द किती रोमांचकारी आहे, याचं चांगलं चित्रण करण्यात आलेलं आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"BookGanga Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":67918741012563,"sku":null,"price":395.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/wmremove-transformed_11_c8aa0ab6-30bd-414d-8713-77f0b2329bc8.jpg?v=1793006049","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/mystery-girl-sadhana-by-sunil-pande","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}