जाहीरनामा
नारायण सुर्व्यांच्या कवितेने मराठी कवितेला मध्यमवर्गीय अनुभवांच्या चौकटीबाहेर नेले. वैयक्तिक सुखदुःखातून व्यापक जनजीवनाशी जोडलेली त्यांची कविता संघर्ष, वेदना आणि सामूहिक जाणीव व्यक्त करते. ‘जाहीरनामा’तून ती आजच्या दुःखाची, नव्या युगाची आणि परिवर्तनाची भाषा बोलते. म्हणून केशवसुत, मर्ढेकर आणि सुर्वे हे मराठी कवितेतील महत्त्वाचे वळण ठरतात.
नव्या माणसाचे आगमन
नारायण सुर्व्यांच्या कवितेने मराठी कवितेला पुन्हा वास्तव जीवनाशी जोडले. कष्टकऱ्यांच्या भावना, स्वप्ने आणि दाहक अनुभवांना त्यांनी काव्यरूप दिले. वैफल्याच्या रूढ चौकटीऐवजी आशावादी, दणकट अनुभवविश्व उभे केले. त्यांच्या कवितेने भाषेतील साचेबद्धपणा मोडून मराठी कवितेला नवे स्वातंत्र्य, व्यापकता आणि जीवनाभिमुखता दिली.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours