{"product_id":"nirday-by-umesh-kadam","title":"Nirday| निर्दय By Umesh Kadam| उमेश कदम","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e१९३७-३८मधला जपानी सैन्याने चीनमध्ये केलेला हिंसाचार – स्त्री-पुरुषांवरील अमानुष अत्याचार – म्हणजेच तेव्हाचा हॉलोकास्ट- जगासमोर आणण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्यांच्याचपैकी एक म्हणजे ‘जियांग चेंग.’ चीनच्या नानकिंग राजधानीला काबीज करण्यासाठी आसुसलेले जपानी सैन्य आणि त्यांच्या पाठिशी असणारे मानवताहीन विचारसणीचे वरिष्ठ – त्यामुळे सोकाळलेले नराधम - त्याबरोबरच चीनच्या वरिष्ठांच्या फक्त स्वत:ची कातडी बचाव निर्णय - या संधीचा पुरेपूर फायदा जपान व जपानी सैनिक घेतात आणि नानकिंगच्या प्रत्येक कोपर्याची लक्तरं करत अभिमानाने फिरू लागतात. नानकिंगमधला सामान्य माणूस हा सैनिकच आहे असं मानून त्यांची सरेआम कत्तल केली जाणारी कत्तल – गरोदर स्त्रीयांवर एकापेक्षा जास्त नराधमांचा बलात्कार – पोटातील गर्भाला अपूर्णावस्थेतच बाहेर काढून कुत्र्यांच्या तोंडी देणे – या हृदय पिळवटून टाकणार्या नानकिंगच्या हत्याकांडाचा इतिहास ‘निर्दय’ या कादंबरीतून मराठी वाचकांसाठी शब्दबद्ध झाला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":67599008464979,"sku":null,"price":297.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/81lXZD8jcbL._SL1500.jpg?v=1791184224","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/nirday-by-umesh-kadam","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}