{"product_id":"nirmohi-ma-cha-devre","title":"निर्मोही, मा. चिं. देवरे | Nirmohi, Ma. Cha. Devre","description":"\u003cp\u003eभारतीय स्वातंत्र्य चळवळीत भूमीगत स्वातंत्र्यसैनिकांचे फार मोठे योगदान आहे. परंतु दुर्दैवाने त्यांचे कार्य समाजापुढे आले नाही. स्वातंत्र्योत्तर काळात शासनाचे अशा भूमीगत स्वातंत्र्यसैनिकांकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष झाले आहे. अनेक लेखक, संशोधकांचे दुर्लक्ष झाले आहे. स्वातंत्र्य चळवळीतील महत्त्वाचे स्वातंत्र्य सैनिक माधवराव चिंधूजी देवरे यांच्या कार्याचा अभिलेख मांडणारी प्रस्तुत कादंबरी 'निर्मोही मा. चिं. देवरे' होय. म. गांधींच्या सविनय कायदेभंग चळवळीतील महत्त्वाची चळवळ महाराष्ट्रातील जंगल सत्याग्रह होय. यात खानदेशातून अष्टाणे परिसरातील जंगल सत्याग्रहाचे नेतृत्व मा. चिं. देवरे करतात. पुढे भूमीगत होऊन खानदेशातील क्रांतीकारकांना अर्थसहाय्यापासून तर आश्रयापर्यंतची मदत करतात. त्यात प्रामुख्याने चिमठाणे येथील साडेपाच लाखांचा खजिना लुटीचा उल्लेख करता येईल. देश स्वतंत्र झाल्यावर मा. चिं. देवरेनी विविध क्षेत्रात भरीव कार्य केलेले आढळते. पिंपळनेर पश्चिम पट्ट्यातील १२५ आदिवासी पाड्यांवर व्हॉलेंटरी शाळा सुरू करतात. साक्री तालुका आदिवासी सेवा मंडळ स्थापन करून मुलांसाठी दोन छात्रालय आणि मुलींसाठी एक छात्रालय सुरू करतात. म्हसदी गाव परीसरातील मुला-मुलींसाठी श्री छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक संस्था स्थापन करून शिक्षणाची गंगोत्री काटवान परिसरात नेली. सहकार चळवळीच्या माध्यमातून पांझरा कान सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीसह भूविकास बँकेचे चेअरमन असा महत्त्वपूर्ण टप्पा ते ९१ वर्षांचे कृतार्थ आयुष्यात परिपूर्ण करतात. खानदेशातील महत्त्वाचे साहित्यिक संजीव गिरासे यांच्या समर्थ लेखणीतून संपन्न प्रस्तुत कादंबरी मराठी साहित्यातील महत्त्वाची ठरावी. सहलेखक रमेश माधवराव देवरे यांनी ही त्यांचे कार्य उत्तम केले आहे. 'निर्मोही मा. चिं. देवरे' ह्या ऐतिहासिक कादंबरीचे वाचक स्वागत करतील ! डॉ. अनिल बैसाणे इतिहास संशोधक, धुळे\u003c\/p\u003e","brand":"Atharva Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":68281408585811,"sku":"9.78936E+12","price":263.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Nirmohi_20ma._20chi._20Deore_20front.jpg?v=1795505321","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/nirmohi-ma-cha-devre","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}