{"product_id":"nivdak-antarnad-निवडक-अंतर्नाद","title":"Nivdak Antarnad (निवडक अंतर्नाद)","description":"निवडक अंतर्नाद\nमराठी माणसाचे काही खरे नाही. मानदंड ठरावीत अशी ज्योत्स्ना, अभिरुची, छंद, सत्यकथा, किलर्लोस्कर, सोबत, माणूस अशी नियतकालिके तो उभी करतो, आणि मग बंदही करतो! महाराष्ट्रात मासिक चालवणे म्हणजे लाखाचे बारा हजार करणे. हे असे का होते? रसिकता कमी पडते की व्यवहार जमत नाही? पण मराठी माणसाचे खरेच काही खरे नाही. कारण हे असे होत असतानाही, एक मराठी माणूस मुंबईमधील आपला सुस्थितीतला व्यवसाय बंद करतो, पुण्याला येतो, 'प्रकाशाचे गाणे अवसेच्या रात्री' म्हणत अंतर्नाद सुरू करतो. त्यानंतरच्या वाटचालीत अंतर्नादने इतिहास घडविला. साहित्यातील नवे जुने हे वाद मानले नाहीत. पुरोगामी-प्रतिगामी असेही काही मानले नाही. वाचकांना बदलत्या भारताचे दर्शन घडविले आणि नव्या जगाची सुरुवात स्वतः पासून होते हे सहजपणे समजावून दिले. चटपटीत पण टाईमपास नव्हे, वैचारिक पण जांभई द्यावयास लावणारे नव्हे असे ललितचिंतनाचे एक प्रसन्न दालन साहित्यविश्वात अंतर्नादने प्रस्थापित केले. निवडक अंतर्नाद म्हणजे त्या वाटचालीतील दमदार, देखणी, अक्षय अक्षरे.\nप्रकाशक. भानू काळे","brand":"Bhanu Kale","offers":[{"title":"Default Title","offer_id":46153320661075,"sku":null,"price":900.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/cover_image_not_available_67dacad2-8992-437c-9ac8-27cb19fb6d39.png?v=1788518896","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/nivdak-antarnad-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%a1%e0%a4%95-%e0%a4%85%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%a6","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}