अंतर्गत नुकसानकारक कृत्यांचा कायदा व ग्राहक संरक्षण अधिनियमाचा परिचय या विषयाचे सखोल व सर्व महत्त्वाच्या घटकांचे सुलभ व मुद्देसूद स्वरूपात सादरीकरण करण्यात आले आहे. जेणेकरून या विषयाची संकल्पना अधिक स्पष्ट आणि प्रभावी रीतीने समजता येईल. प्रस्तुत ग्रंथाचा मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये कायद्याची मूलभूत समज, सामाजिक न्यायाची जाणीव आणि ग्राहक हक्कांबाबत सजगता निर्माण करणे. त्या माध्यमातून समाजातील असमानता, व्यक्ती व संपत्तीचे संरक्षण, न्यायव्यवस्थेची कार्यपद्धती आणि कायदेशीर उपाय यांचा विस्तृत परिचय वाचकांना मिळेल. विशेषतः ग्राहक संरक्षण अधिनियम, १९८६ याचे नियम, तरतुदी आणि त्याचे व्यवहारातील उपयोग समजून घेणे हे या विषयाचे केंद्रबिंदू आहे. या पुस्तकाचे खास वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये साधी, सोपी व समजणारी भाषा वापरून विषयाचे स्पष्टीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह सामान्य वाचकांनाही हे पुस्तक उपयुक्त ठरेल.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours