{"product_id":"olkh-mardani-kalechi-by-v-s-chopdar","title":"Olkh Mardani Kalechi| ओळख मर्दानी कलेची By V S Chopdar| वि श्री चोपदार","description":"\u003cp\u003eकोल्हापूर म्हणजे कलानगरी, या नगरीत अनेक कलाकार जन्माला आले, अनेक कला जोपासल्या गेल्या; आणि अशा कलांपैकीच एक दुर्मिळ कला मर्दानी खेळ. तीन तपाहून अधिक काळ या कलेचा अभ्यास करून ही कला लोकांपर्यंत व शासन दरबारी पोहचविण्याचे कार्य करणारे, संस्था मंडळ, संघटना, व्यक्तिमत्व शिबिर या माध्यमातून शेकडो तरुण-तरुणींच्यामध्ये मर्दानी कलेची आवड निर्माण करणारे, स्वतःबरोबरच समाजाचे रक्षण करून समर्थ युवापिढी घडविणारे उमदे व्यक्तिमत्व म्हणून श्री. विनय श्रीकांत चोपदार साऱ्या करवीरवासियांना परिचित आहेत. तरुण वयातच 'वस्ताद' पद भूषविणारे व मर्दानी खेळाची पताका साऱ्या महाराष्ट्रभर फडकवत ठेवणारे वस्ताद 'आबाजी' या नावाने साऱ्यांना परिचित व आदरणीय आहेत.\u003cbr\u003eसमाजकल्याण मंत्रालयाबरोबरच अनेक संस्थांनी त्यांना उचित सत्कार व पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. 'प्राचीन युद्धकला महर्षी' या पुरस्काराने त्यांचा गौरव केला आहे.\u003cbr\u003eआजवरच्या अनुभवातून व अभ्यासातून त्यांनी प्राचीन मर्दानी खेळावर पुस्तक लिहून भावी पिढीसाठी मौलिक कार्य केले आहे.\u003cbr\u003eपर्णाल इतिहास संशोधन मंडळ, पन्हाळा\u003c\/p\u003e","brand":"Mulukhgiri Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":67645936500819,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/dcos_2_afbc07ae-9130-49dd-a9d9-bb16cba7eeae.jpg?v=1791621965","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/olkh-mardani-kalechi-by-v-s-chopdar","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}