Skip to product information
Origin of Species | ओरिजिन ऑफ स्पेसीज By Charles Darwin, Dhananjay Keskar | धनंजय केसकर, चार्ल्स डार्विन
Rs. 550.00
Publisher: Goel Prakashan
Language: Marathi

चार्ल्स डार्विन हे निसर्गाचे अभ्यासक, भू-विज्ञानशास्त्रज्ञ व जीवशास्त्रज्ञ होते. त्यांनी हे पुस्तक लिहिले आहे. जीवांच्या सर्व जाती या एकाच पूर्वजाच्या वंशज आहेत, हा त्यांचा सुप्रसिद्ध सिद्धांत विज्ञानाची पायाभूत संकल्पना आहे.
जीवसृष्टीच्या भौतिक परिस्थितीचा परस्पर-संबंध याविषयीचे रूढिप्रिय विचार आणि कल्पना किंवा विशास यांना आव्हान देणारा सिद्धांत या पुस्तकातून ते मांडतात. गुंतागुंतीचे व क्लिष्ट असे जातींचे एकमेकांवरील, तसेच सभोवतालच्या परिस्थितीवरील किंवा वातावरणावरील परस्परावलंबन या पुस्तकातून उघड होते.
ऑन द ओरिजिन ऑफ स्पेसीज हे पुस्तक जेव्हा प्रसिद्ध झाले, तेव्हा त्यासंबंधी खूपच विवाद होते व आजही ते तसेच आहेत. परंतु हे पुस्तक काळाच्या ओघात सर्व कसोट्यांना उतरले आहे व मनुष्याच्या उत्क्रांतीसंबंधी शास्त्रीय स्पष्टीकरण देण्यात अग्रगण्य ठरले आहे.

निसर्गप्रेमींसाठी या पुस्तकात डार्विनच्या इंग्रजी पुस्तकातील शास्त्रीय माहिती, निरीक्षणे आणि चर्चा शास्त्रीय परिभाषेत पण सोप्या व आकर्षक शैलीत मांडली आहेत. मराठी वाचकांच्या दृष्टीने डॉ. धनंजय केसकर यांचे निसर्गातील जातींचा उगम हे पुस्तक 'वैचारिक खजिना' आहे. - डॉ. माधव पेंडसे. (निवृत्त प्राचार्य. सर परशुरामभाऊ महाविद्यालय, पुणे )
'ऑरिजिन ऑफ स्पेसीज' या पुस्तकाच्या मराठी आवृत्तीबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! विज्ञान, विशेषतः उत्क्रांतीवादासारख्या गुंतागुंतीच्या विषयावर इतक्या अभ्यासपूर्ण पद्धतीने मराठी भाषेत लेखन करणे हे खरोखरच प्रशंसनीय आहे. -पद्म श्री व पद्म भूषण कुलपती प्रा.डॉ. शां. ब. मुजुमदार



Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Origin of Species | ओरिजिन ऑफ स्पेसीज By Charles Darwin, Dhananjay Keskar | धनंजय केसकर, चार्ल्स डार्विन

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like