अंत:करणातली सल उलगडणारे शब्द जेव्हा कवितेत रुपांतरीत होतात तेव्हा तेच शब्द निश्चितपणे अंत:करणाला भिडतात. आपल्या भावभावना जोपासत एक नवा आयाम समाजाला देतांना सामाजिक चौकट मोडीत काढत इतिहास निर्माण करणार्या महापुरुषांची पाऊलवाट निवडणार्या कवयित्री ज्योती वाघ बाविस्कर यांची कविता सामाजिक जाणीवेला नवा विचार देणारी अशीच आहे. समाज व्यवस्थेतील वास्तवता पाहून त्या लिहितात, एकटं-एकटं वाटतं रे गर्दीत ही राहून मेंदूला ही झिंग येते स्वार्थी लोक पाहून माणसाच्या मनोवृत्तीची जाणीव करून देताना माणसांची स्वार्थी वृत्ती त्या मांडतात अशा या मानवी समाज व्यवस्थेला माणुसकीची ओल आणि माणुसकीची सल त्या आपल्या कवितेतून स्पष्ट करतात. त्यांच्या कवितेला समृद्ध अशी पाऊलवाट निर्माण होवो, त्यांची कविता माणसाच्या जगण्याला अर्थ प्राप्त करून देण्यासोबतच माणसाच्या मनोशीलतेचा विचार मांडणारी अशीच आहे हाच संवाद कवितेतून सर्वोत्तम राहो ह्या सदिच्छा. -डॉ. मिलिंद विनायक बागुल
Pickup available at HO
Usually ready in 24 hours