Skip to product information
Pakshyanchi Kodi | पक्ष्याची कोडी By Pr Deoba Shivaji Patil | प्रा देवबा शिवाजी पाटील
Rs. 100.00
Pages: 60
Language: Marathi

प्रिय बालमित्रांनो! आपला अमूल्य पण फावला वेळ आनंदात घालवण्याचा, शुध्द व निर्भेळ करमणुकीद्वारे ज्ञान मिळवण्याचा कोडी हा एक उत्तम उपाय आहे. तशीच ही कोडीसुध्दा ज्ञानवर्धक, आनंददायी व बुध्दिवर्धक आहेत. आपण ती वाचून त्यांचा जरूर उपयोग करून घ्यावा.
ह्या कोड्यांच्या बालकाव्यसंग्रहात मुलांच्या आवडत्या चिमणी, कावळा, पोपट, कबुतर, कोंबडा, कोकिळा, बगळा, बदक, मोर अशा पक्ष्यांची आणि सामान्यतः सुपरिचित अशा इतरही काही पक्ष्यांची रंग, रूप, आकार अशी विविध गुणवैशिष्ट्ये, त्यांचे वास्तव्य, खाद्य व त्यांच्यासंबंधी इतर काही महत्वाच्या गोष्टी साध्या, सरळ व रंजक भाषेत कोड्यांच्या कवितांद्वारे रेखाटली आहेत. त्यामुळे ह्या कोडेवजा कवितांमधून, कोड्यांतून मुलांचे मनोरंजनही होईल व त्यांना ज्ञानही मिळेल.
तरी प्रत्येक शालेय बालक-बालिकांनी हे पुस्तक खरेदी करून कायमस्वरूपी आपल्या संग्रही ठेवण्यासारखे त्यांच्यासाठी ते खात्रीने उपयोगी आहे. तुम्हीसुध्दा हे पुस्तक वारंवार वाचून नवनवीन कोडी बनवून आपले निखळ मनोरंजन करीत आपले ज्ञान वाढवून आपल्या बुध्दीचा विकास करु शकता. बालपणापासून झालेला बुध्दीचा विकास हा भावी जीवनात खूपच कामी येतो.

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Pakshyanchi Kodi | पक्ष्याची कोडी By Pr Deoba Shivaji Patil | प्रा देवबा शिवाजी पाटील

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like