Skip to product information
Panchtantratil Nitishastra | पंचतंत्रातील नीतिशास्त्र by सीए. मिलिंद श्रीधर भावे | CA. Milind Shridhar Bhave
Rs. 325.00
Pages: 167
Language: Marathi
Overview:
पंचतंत्रातील नीतिशास्त्र हे केवळ मुलांसाठीच्या मनोरंजक गोष्टींचं संकलन नाही; तर त्यामध्ये जीवन, समाज आणि सत्ताव्यवस्थेच्या मूलभूत तत्त्वांचा सखोल विचार मांडलेला आहे. व्यक्तिगत जीवनापासून ते सार्वजनिक व्यवहारांपर्यंत, तसेच समाजकारण, अर्थकारण, राजकारण आणि सांस्कृतिक घडामोडी समजून घेण्यासाठी आवश्यक असलेली नीती आणि धोरणं पंचतंत्राच्या कथांमधून उलगडत जातात. योग्य निर्णय घेण्याची क्षमता विकसित करण्यासाठीही या तत्त्वांचा मोठा उपयोग होतो. संस्कृत श्लोकांच्या आधाराने आणि पशू-पक्ष्यांच्या रूपकात्मक कथांद्वारे हे ज्ञान अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात आले आहे. मानवी आयुष्य हा सतत चालणारा प्रवास आहे. या प्रवासात प्रत्येक जण आपल्या क्षमतेनुसार यशस्वी, अर्थपूर्ण आणि समाधानकारक जीवन जगण्याचा प्रयत्न करीत असतो. त्या प्रयत्नांना दिशा देणारं ज्ञान म्हणजे नीती. नीतिशास्त्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या ज्ञानशाखेचं महत्त्व जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर जाणवतं. पंडित विष्णुशर्मा यांनी पंचतंत्रातील कथांमधून हेच नीतिज्ञान अत्यंत सुबोध आणि परिणामकारक स्वरूपात मांडलं आहे. या कथांचा बारकाईने अभ्यास केल्यास जीवन अधिक सफल, सार्थक आणि विवेकी बनवण्यासाठी पंचतंत्र कोणतं मार्गदर्शन करतं, याचा वेध घेता येतो. त्या दिशेने केलेला अभ्यासपूर्ण आणि चिंतनशील प्रयत्न म्हणजे हे पुस्तक.

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Panchtantratil Nitishastra | पंचतंत्रातील नीतिशास्त्र by सीए. मिलिंद श्रीधर भावे | CA. Milind Shridhar Bhave

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like