Skip to product information
परागंदा | Paragandha by श्री. व्यं. केतकर | S. V. Ketkar
Sale price  Rs. 216.00 Regular price  Rs. 240.00
Pages: -
Language: Marathi
Overview:
डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर हा मराठी ज्ञानक्षेत्राचा मानबिंदू आहे ; मानदंडही आहे. का नसावा ? त्यांनी ज्ञानकोशाच्या तेहतीस खंडांनी ज्ञानसागराचे मंथन करून महाराष्ट्राच्या करतालावर अमृताचा नैवेद्य ठेवला; त्यांनी समाजशास्त्रीय दृष्टीने मराठी संस्कृती आणि मराठी साहित्य यांचा वेध घेतला : त्यांनी वेलीसारख्या वेटोळे घालून बसलेल्या मराठी कादंबरीला घनदाट अरण्याचे रूप दिले. मीच हे सांगितलेपाहिजे अशा स्वभावाचे शेजवलकर , श्रीकेक्षी आणि दुर्गाबाई यांना त्यांनी मोहित केले - परागंदा या कादंबरीला जोडमथळा आहे, भारतीय समाजाची सरहद्द हा १९२६ साली प्रकाशित झालेली ही कादंबरी आजही मराठी वाचकाला अंतर्मुख करणारी चर्चाप्रधान कादंबरी आहे; कारण तिचा विषय आहे अमेरिकेत स्तलांतरित झालेली भारतीय. केतकरी कादंबरीतील सर्व सीमा-सामर्थ्य या कादंबरीत प्रातिनीधिक स्वरूपात अवतीर्ण झाले आहे. डॉ. मत्तमयूरीच्या रूपाने लेखकाने येथे वेश्यासंततीचा प्रश्नही हाताळला आहे ; अशी ही आपल्या समाजाची आणि कादंबरीकाराची सरहद्द अधोरेखित करणारी कादंबरी. - डॉ. द. भि. कुलकर्णी हे मराठी कादंबरी वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Book cover type

You May Also Like