माणसाच्या जीवन जगण्याच्या आयुष्यातील अनेक वाटा साहित्याने, संगीताने समृद्ध केलेल्या आहेत. जीवनमानाचा विचार करता अनेकदा काही प्रसंग असे घडतात की, त्या प्रसंगाशी कधी एकरूप व्हावे लागते, तर कधी त्या त्या प्रसंगांना सामोरे जावे लागते. कधी प्रसंगानुरूप वागावे लागते, तर एखादा प्रसंग आपल्याला बदलवून टाकतो. साहित्याने अनेकांच्या जीवनमानाला, व्यक्तिमत्त्वाला घडविण्याचा प्रयत्न नव्हे; तर घडविलेलेच आहे. सामाजिक बदलाला खरेतर साहित्याने खूप योगदान दिलेले आहे. निसर्ग आणि माणसाचे असणारे नाते साहित्याने दृढ केल्याचे आपणा सर्वांच्या लक्षात येईल. निसर्ग आपल्या साऱ्याच गोष्टी देताना सदाबहार असतो आणि हाच गुण माणसाने आपल्या अंगी अंगीकारल्यास समाजवास्तव बदलल्याशिवाय राहणार नाही. पुरोगामी अशा विचारांना आणि माणसाला केंद्रबिंदू मानत निसर्गाला साद घालणाऱ्या मोजक्या अशा साहित्यिकांनी समाजमनाची दिशा बदलविण्याचा प्रयत्न केला आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours