पर्यावरण हे मानवाच्या अस्तित्वाचा आणि विकासाचा मूलभूत आधार आहे. मानव, वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव तसेच हवा, पाणी, मृदा आणि ऊर्जा यांसारखे जैविक व अजैविक घटक परस्परावलंबी संबंधांद्वारे पर्यावरणाची निर्मिती करतात. या घटकांमधील संतुलनामुळे पृथ्वीवरील जीवन सुरळीतपणे चालते; परंतु लोकसंख्या वाढ, औद्योगिकीकरण, शहरीकरण, नैसर्गिक संसाधनांचे अतिरेकी शोषण, प्रदूषण आणि हवामान बदल यांमुळे पर्यावरणीय संतुलन धोक्यात आले आहे. आजच्या काळात पर्यावरणाचा अभ्यास मानवाच्या अस्तित्वाशी, विकासाशी आणि शाश्वत भवितव्याशी निगडित असल्यामुळे त्याचे महत्त्व अधिक वाढले आहे. पर्यावरणाचे संरक्षण, संवर्धन आणि शाश्वत व्यवस्थापन यासाठी पर्यावरणशास्राचे ज्ञान अत्यावश्यक मानले जाते. पर्यावरण भूगोलाच्या अभ्यासातून पर्यावरणाचे स्वरूप, घटक, संसाधने, प्रदूषण, नैसर्गिक आपत्ती, मानवनिर्मित आपत्ती, तसेच मानव-पर्यावरण संबंध यांचे सखोल ज्ञान प्राप्त होते. या अभ्यासातून पर्यावरणीय असंतुलनामुळे निर्माण होणार्या विविध समस्या आणि त्यांचे परिणाम स्पष्ट होतात. त्यामुळे पर्यावरणाचे संरक्षण, संवर्धन आणि शाश्वत उपयोग सुनिश्चित करण्यासाठी प्रभावी व्यवस्थापनाची आवश्यकता निर्माण झाली आहे. प्रस्तुत पुस्तकात पर्यावरण भूगोलासह पर्यावरणीय समस्या, आव्हाने आणि व्यवस्थापन या मुद्द्याचा साध्या, सोप्या व परिणामकारक भाषेत मांडण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर सदरचे पुस्तक सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक परीक्षा, एमपीएसी, युपीएससी तसेच नेट/सेट परीक्षांना जास्तीत जास्त उपयुक्त होईल, असाही प्रयत्न केलेला आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours