Skip to product information
Patanjal Yogdarshan Bhartiya Manasshastra Athawa Sarth Ani Avivaran | पातञ्जल योगदर्शन भारतीय मानसशास्त्र अथवा सार्थ आणि सविवरण by कृष्णाजी कोल्हटकर | Krishnaji Kolhatakar
Sale price  Rs. 1,049.00 Regular price  Rs. 1,200.00
Pages: 524
Language: Marathi
Overview:
श्री. रा. कृ. के. कोल्हटकर ह्यांनीं लिहिलेल्या 'भारतीय मानसशास्त्र अथवा सार्थ आणि सविवरण पातञ्जल योगदर्शन' ह्या ग्रंथास प्रस्तावनेदाखल दोन शब्द लिहिण्यास मला फार संतोष होतो.हल्लींच्या विश्वविद्यालयीन शिक्षणक्रमांत समाविष्ट करतां येईल अशा प्रकारचा मराठींतून लिहिलेला योगशास्त्रांचें विवरण करणारा ग्रंथ उपलब्ध नसावा ही खेदाची गोष्ट होय. ही उणीव ह्या ग्रंथानें भरून निघेल अशा प्रकारचा हा ग्रंथ आहे. वेदान्त व सांख्य ह्या शास्त्रांना आधुनिक विश्वविद्यालयाच्या अभ्यासक्रमांत जें स्थान आहे तें योगशास्त्रास नाहीं. ही वस्तुस्थिती आहे खरी; परंतु ह्या दोनही शास्त्रांपेक्षा योगशास्त्राची योग्यता कोणत्याही प्रकारें कमी नाहीं; उलट वेदान्तशास्त्रांतील सिद्धान्तांची यथार्थता पडताळून पहाण्यास योगशास्त्रच समर्थ आहे, योगसूत्रांची भाषा फार जुनी असल्यामुळे कांहीं सूत्रांचा संगतवार अर्थ लावणें कठीण जातें; तरी श्री. कोल्हटकर ह्यांचें योगदर्शनाचें भाषांतर व विवरण वाचून व त्यांच्याशीं प्रत्यक्ष चर्चा करून पाहतां त्यांनीं ह्या कामीं पुष्कळच मेहनत करून व बुद्धिचातुर्य दाखवून हें काम फार वर्णनीय रीतीनें पुरें केलें आहे, असें म्हणण्यास काहीं प्रत्यवाय नाहीं. ह्या ग्रंथांत उपलब्ध सर्व टीकांचा सूक्ष्म विचार करून श्री. कोल्हटकरांनीं स्वतंत्रपणें योगसूत्रांचा अर्थ लावण्याचा जो प्रयत्न केला आहे तो फार स्तुत्य आहे. ह्यामुळे ज्या सूत्रांचा संदर्भ लावणें कठीण जातें त्या सूत्रांचेही रहस्य ह्या ग्रंथवाचनानें सहज समजेल.श्री. कोल्हटकरांचा वेदान्तशास्त्राचा अभ्यासही चांगला आहे. ह्यामुळे योग व वेदान्तशास्त्रांचा तौलनिक अभ्यासकरण्यास ते योग्य आहेत.सेवानिवृत्त झाल्यावर अशीं कामें केलेली फारच विरळ माणसें दृष्टीस पडतात; अशा प्रकारचीं चार-पांचच उदाहरणें माझ्या अवलोकनांत आहेत.ह्या ग्रंथांतील विषयांशी संबंध असलेल्या मानसशास्त्रांतील कांहीं प्रश्नांचा अभ्यास करून त्या दृष्टीनें योगसिद्धान्तांचा ऊहापोह श्री. कोल्हटकरांनीं आपल्या भूमिकेंत सुविस्तृतपणें केला आहे व तो उद्बोधक झाला आहे. त्या दृष्टीनें योगशास्त्रांतील प्रमेयांचा असा ऊहापोह करण्याचा उपक्रम अगदीं नवीन असून तो सर्वथा अभिनंदनीय आहे.योगशास्त्राचें इतकें समर्पक विवरण मराठी वाङ्मयांत उपलब्ध नाहीं. महाराष्ट्र विश्वविद्यालयांत सर्व विषय मराठींतून शिकवले जातील त्या वेळी हें पुस्तक प्रसिद्ध झाल्यानें त्याचा बी. ए. व एम्. ए. च्या विद्यार्थ्यांना फार उपयोग होईल. ह्या दुर्बोध शास्त्राचें मराठींतून विवरण झाल्यानें सामान्य वाचकवर्गासही ह्या पुस्तकाचा चांगला उपयोग होईल.अशा प्रकारचा हा ग्रंथ असल्याने तो प्रकाशित होण्याने सर्व जनतेचें हितच होणार आहे, म्हणून उदार व विद्याप्रेमी धनिकांनीं व विश्वविद्यालयासारख्या शिक्षणसंस्थांनीं ह्या ग्रंथास देणग्या देणें, वगैरे हरप्रकारें मदत करून ग्रंथकाराच्या परिश्रमांचें योग्य चीज करावें.रा. द. रानडे***

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Patanjal Yogdarshan Bhartiya Manasshastra Athawa Sarth Ani Avivaran | पातञ्जल योगदर्शन भारतीय मानसशास्त्र अथवा सार्थ आणि सविवरण by कृष्णाजी कोल्हटकर | Krishnaji Kolhatakar

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like