भारतीय प्रबोधनाच्या वैचारिक चळवळीत म.फुले छ.राजर्षी शाहु महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान हे अतुलनीय स्वरुपाचे आहे. सामाजिक धार्मिक व राजकीय विचाराचे प्रवाह आणि काही अंतःप्रवाह ग्रंथरुपाने अभिव्यक्त झाले आहे. उपरोक्त विचार प्रवाहाचे स्पष्टीकरण लेखकाने आजच्या परिप्रेक्ष्यात केले आहे, जे अध्ययानाच्या दृष्टीने उपयुक्त आहे.लेखकाने केवळ फुले-शाहु-आंबेडकर विचारांना अधोरेखित केले असे नाही तर अनेकांगी जे प्रश्न व द्वंद्व ध्यानात घेऊन इतर महत्वपूर्ण विचारवंत व समकालीन राजकीय परिस्थितीचा सुक्ष्मत्वाने अभ्यास केल्याचे निर्दशनास येते. प्रस्तुत ग्रंथ हा एकूण १५ प्रकरणात विभागला आहे. प्रस्तुत प्रबोधनात्मक ग्रंथ हा अनेक विषयावर भाष्य करणारा आहे. खरेतर १३ आणि १४ व्या शतकानंतर सामाजिक समतेच्या परिवर्तनवादी चळवळी आधुनिक संदर्भात उदयास आलेल्या आढळतात. विचारांना व्यापक अर्थांने गती ही १९ व्या शतकात मिळाली. अर्थात ब्रिटीश राजवटीत समाज सुधारणेचा आधुनिक दृष्टिकोन भारतात व विशेषतः महाराष्ट्रात रुजलेला निर्दशनास येतो. पाश्चात्य शिक्षणातून स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुत्व, धर्मनिरपेक्षता, विवेकवाद व विज्ञाननिष्ठा या सर्व उदात्त मूल्यांचा प्रभाव भारतीय विचारवंत व समाजसुधारकांवर पडला. या सर्व प्रक्रियेतून समाजात बदल होत असतात. म्हणून विज्ञाननिष्ठ नवभारताच्या जडणघडणीत अनेक विचारवंतानी मोलाची भर टाकली आहे. त्याचा अभ्यासपूर्ण आढावा डॉ. माधव केरबा वाघमारे यांनी आजच्या संदर्भात घेतला आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours