प्रस्तुत ग्रंथाच्या प्रारंभी इतिहास व ऐतिहासिक साधने यांचे स्पष्टीकरण देवून ऐतिहासिक साधनांचे मुद्दे व उपमुद्दे समाविष्ट करून सखोल माहिती दिली आहे. तसेच हडप्पा (सिंधू) संस्कृतीवर विविध साधनांद्वारे विशेष संदर्भ देवून विस्तृत विवेचन देण्यात आले आहे. वैदिक कालखंडाची विद्यार्थी वर्गास समजेल अशा साध्या भाषेत ओळख करून दिली आहे. त्याचप्रमाणे वर्धमान महावीर, जैन धर्माची शिकवण, गौतम बुद्ध व बौद्ध धर्माची शिकवण या धर्माचा उदय, प्रसार व र्हास, मौर्योत्तर कालखंड शुंग, कुशाण, सातवाहन सत्ता, गुप्त साम्राज्यातील प्रशासन व्यवस्था, समाजजीवन व आर्थिक परिस्थिती तसेच हर्षवर्धन व त्याची कामगिरी, धार्मिक धोरणे, तद्नंतर राजपूत कालखंड, कनौज, गुर्जर, प्रतिहार, गढवाल-राठोड, अजमेर चाहमान (चव्हाण), मेवाडचे गुहिलोत, बुंदेलखंडचे चंदेल, वेदीचे कलचुरी, माळव्याचे परमार इत्यादी राजपूर वंश, दक्षिण भारतातील राष्ट्रकूट, चालुक्य व पल्लव घराणे यावर आधारित मुद्यांशी संबंधित घटनांची माहिती विस्ताराने व वस्तूनिष्ठ स्वरुपात मुद्यांसहित मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours