भारतीय संस्कृती आणि सभ्यता अतिशय गतिमान, अद्वितीय आणि मनोरंजक आहे. भारतीय संस्कृती ही जगात अस्तित्वात आलेल्या संस्कृतींपैकी ही एक आहे. ऐतिहासिक नोंदीत महान राष्ट्राची सुरुवात सिंधू संस्कृतीपासून होते. भारतात गांधार शैली, मथुरा शैली आणि अमरावती शैली यांसारख्या अनेक कलाशैली उदयास आल्या. कुशाणांच्या राजवटीत मथुरा शैली यशाच्या शिखरावर पोहोचली. सातवाहन काळात अमरावती शैली आणि शिल्पकला शैली विकसित झाली. चौथ्या आणि पाचव्या शतकाला भारताचा सुवर्णकाळ म्हणून संबोधले जाते. प्रस्तुत पुस्तकात सिंधू संस्कृतीची कला, स्थापत्यशिल्पे संस्कृती, मौर्यकालीन कला, संस्कृती, स्थापत्यकला आणि टेराकोटा कला, प्राचीन बौद्धकला आणि वास्तुकला, प्रादेशिक स्थापत्यशैलीचा उदय, महाराष्ट्रातील कला आणि स्थापत्य, प्राचीन महाराष्ट्रातील लेणी याविषयी सविस्तर विवेचन केलेले आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours