{"product_id":"prachin-bharatiya-prashasan","title":"प्राचीन भारतीय प्रशासन | Prachin Bharatiya Prashasan","description":"\u003cp\u003e‘प्राचीन भारतीय प्रशासन’ हे पुस्तक केवळ इतिहासाची माहिती देणारे नसून, भारतीय समाजाच्या जडणघडणीत आणि राष्ट्राच्या प्रगतीत प्रशासन व्यवस्थेचे योगदान समजून घेण्याची संधी देणारे आहे. प्रस्तुत पुस्तकातून त्या-त्या काळातील शासनरचना, निर्णयप्रक्रिया, न्यायनिती, अर्थकारण, ‘सभा’ व ‘समिती’, ‘जन’ व ‘विश’, ग्रामव्यवस्था, धर्माचा प्रभाव, आणि साधनसंपत्तीचा वापर तसेच जनजीवनावर झालेल्या परिणाम हे मुद्दे अभ्यासता येतात. प्राचीन प्रशासनाचा इतिहास समजून घेताना प्रस्तुत पुस्तकातील माहिती मुद्देसूद दिल्यामुळे केवळ भूतकाळाची माहिती मिळत नाही, तर अनेक व्यावहारिक आणि बौद्धिक फायदे होतात. एखाद्या काळातील निर्णय योग्य की अयोग्य होते, हे समजून घेण्याची क्षमता वाढते. वेगवेगळ्या युगातील प्रशासनाची तुलना करता येते. भूतकाळातील अनुभवांवरून भविष्यासाठी योग्य धोरणे आखण्याची समज वाढते. आपल्या इतिहासातील उच्च परंपरा व यशाची जाणीव होते. इतिहास, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र यांचा संगम अनुभवता येतो. एकंदरीत स्पर्धा परिक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना, अभ्यासकांना या संदर्भ ग्रंथाचा निश्चितच उपयोग होईल.\u003c\/p\u003e","brand":"Atharva Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":68281398558803,"sku":"9.78936E+12","price":195.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Prachin_20Bhartiy_20Prashasan_20Front.jpg?v=1795505200","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/prachin-bharatiya-prashasan","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}