FREE DELIVERY
प्राचीन मंत्रविद्येच्या सामर्थ्याचा शोध घेणारं विलक्षण पुस्तक!
हजारो वर्षांपूर्वी भारतीय ऋषिमुनींनी विकसित केलेली मंत्रविद्या आजही तितकीच प्रभावी असल्याचं मानलं जातं. मात्र मंत्र म्हणजे नेमकं काय? मंत्रांमध्ये सामर्थ्य कशामुळे निर्माण होतं? योग्य मंत्राची निवड कशी करावी? गुरूच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाशिवाय मंत्रसाधना करता येते का? आणि आध्यात्मिक तसेच भौतिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी मंत्रसाधनेचा उपयोग कसा होऊ शकतो?
या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं हिमालयातील साधक आणि लोकप्रिय लेखक ओम स्वामी यांनी आपल्या ‘The Ancient Science of Mantras’ या पुस्तकातून दिली आहेत.
मंत्रांची उत्पत्ती, त्यांच्यामागील तत्त्वज्ञान, मंत्रजपाची पद्धत, साधनेतील नियम आणि मंत्रयोगाची मूलभूत तत्त्वं यांचं सविस्तर विवेचन या पुस्तकात आढळतं. परंपरेने गुरू-शिष्यांपुरतं मर्यादित राहिलेलं मंत्रसाधनेचं ज्ञान लेखकाने आपल्या अनेक दशकांच्या प्रत्यक्ष साधनेच्या अनुभवातून वाचकांसमोर मांडलं आहे.
सोप्या, ओघवत्या भाषेत लिहिलेल्या या पुस्तकात आध्यात्मिक चिंतनाबरोबरच लेखकाचे वैयक्तिक अनुभव, प्रसंग आणि त्यांनी स्वतः आचरणात आणलेल्या साधनांचाही समावेश आहे.
भारतीय मंत्रपरंपरा, ध्यान, योगसाधना आणि आत्मपरिवर्तन यांविषयी जिज्ञासा असणाऱ्या प्रत्येक वाचकासाठी हे पुस्तक एक महत्त्वपूर्ण मार्गदर्शक ठरू शकतं.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours