{"product_id":"prakhar-rashtrabhimani-dr-babasaheb-ambedkar","title":"प्रखर राष्ट्राभिमानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर | Prakhar Rashtrabhimani Dr. Babasaheb Ambedkar","description":"\u003cp\u003eडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची देशासमोरील प्रश्न व समस्या सोडविण्याची पद्धत त्यांच्या समकालीन नेत्यांपेक्षा वेगळी होती. ते पहिल्यांदा राष्ट्रासमोरील प्रश्न व समस्यांचा बारकाईने अभ्यास करायचे, त्यानंतर ते त्या प्रश्नांसंदर्भात योग्य ते धोरण ठरवून त्याची अंमलबजावणी करायचे. त्यांच्या व्यक्तित्वात उत्कट अशी राष्ट्रभक्ती होती. त्यांच्यासाठी राष्ट्र हे सर्वोपरी होते. ‘आपण प्रथमतः भारतीय आहोत, आणि अंतिमतः देखील भारतीय आहोत’ असा राष्ट्रवादी विचार त्यांनी मांडला होता. त्यामुळे केवळ दलितांचे कैवारी, घटनाकार यापुरते त्यांचे व्यक्तिमत्व मर्यादित न ठेवता, त्यांचे दुर्लक्षित राहिलेले राष्ट्रनिर्मितीतील योगदान अनन्यसाधारण महत्वाचे आहे. त्यांचे पाणी नियोजन, उर्जा विकास, धरणे, आर्थिक नियोजन व राज्य पुनर्रचना इत्यादी महत्वपूर्ण राष्ट्रनिर्मितीचे कार्य समाजासमोर येणे गरजेचे आहे. या कार्यात त्यांनी भरीव स्वरुपाची कामगिरी करून राष्ट्राचा पाया मजबूत केला. बाबासाहेबांचं राष्ट्रप्रेम, देशभक्ती आजच्या परिस्थितीत अत्यंत प्रेरणादायी ठरत आहे. या त्यांच्या राष्ट्राभिमानाचा सविस्तर आढावा प्रस्तुत पुस्तकात घेण्याचा प्रत्यत्न केला असून वाचकांना बाबासाहेबांच्या विविध पैलूंची ओळख होणार आहे.\u003c\/p\u003e","brand":"Atharva Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":68281410355283,"sku":"9.78936E+12","price":296.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Prakhar_20Rashtrabhimani_20Dr.Babasaheb_20Ambedkar_20front.jpg?v=1795505345","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/prakhar-rashtrabhimani-dr-babasaheb-ambedkar","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}