गमतीदार कोड्यांचा माहितीप्रद बालकाव्यसंग्रह : प्राण्यांची कोडी'
प्रिय बालमित्रांनो ! कोणतीही कोडी म्हणजे बुध्दीला उत्तम खुराक असतात. बुध्दीला ते शक्तिवर्धक औषध म्हणजे 'टॉनिक' असतात. कोड्यांनी बुध्दीला गती मिळते, चालना लाभते. बुध्दीची सारासार विचार करण्याची शक्ती वाढते. त्यामुळे बौध्दिक कार्यक्षमताही वाढतात. बौध्दिक क्षमता वाढल्या म्हणजे आपोआप बुध्दीची आकलनशक्ती, धारणाशक्ती व स्मरणशक्ती ह्या तिन्ही शक्तीही वृध्दिंगत होतात. अशी ही कोडी आपला बुध्यांक वाढविण्यासाठी हमखास उपयोगी पडणारी आहेत. थोडक्यात कोणतीही कोडी ही बुध्दिवर्धक असतात. तशीच ही कोडीसुध्दा ज्ञानवर्धक व बुध्दिवर्धक आहेत. आपण ती वाचून त्यांचा जरूर फायदा घ्यावा.
मनोरंजनातून ज्ञान मिळवण्याचा कोडी हा एक उत्तम मार्ग आहे. ह्या पुस्तकात प्राण्यांची विविध गुणवैशिष्ट्ये सोप्या व रंजक भाषेत कोडेवजा कवितांच्या माध्यमातून वर्णिली आहेत. त्यामुळे ह्या कवितांमधून, कोड्यांतून मुलांना ज्ञानही मिळेल. म्हणून प्रत्येक शालेय मुलामुलींनी हे पुस्तक विकत घेऊन आपल्या संग्रही ठेवण्याइतके त्यांच्यासाठी हे हमखास उपयोगी आहे. तुम्हीसुध्दा हे पुस्तक वारंवार वाचून नवनवीन कोडी बनवून आपले ज्ञान व आपली बुध्दी वाढवू शकतात. शालेय जीवनात झालेला बुध्दीचा विकास हा संपूर्ण आयुष्यभर कामी येतो.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours