Skip to product information
Overview:
उदयास्त ४९०/- एकीकडे कामाठीपुऱ्यातलं बदनाम वास्तव, तर दुसरीकडं विठोबाची भक्ती. या दोन्हीचा अनोखा संगम साधत रचलेलं दमदार कथानक म्हणजे, उद्यास्त (अवसान) ही कादंबरी. कामाठीपुऱ्यातल्या वेश्येच्या पोटी जन्मलेल्या सत्याची ही कहाणी. सत्याचं भविष्य उज्वल असावं म्हणून त्याची कामाठीपुऱ्यातून एका आश्रमात रवानगी होते. तिथं त्याच्यात विठुभक्तीचे नवे संस्कार रुजतात. सत्याचं आयुष्य नवी उभारी घेतं. पण त्याचं भागदेय तरीही त्याला सुखासीन आयुष्य बहाल करत नाही. तो नोकरी करत असलेल्या कारखान्याच्या मालकाचा मृत्यू होतो आणि त्याच्या आयुष्यात नवं वादळ येतं. मानवी नात्यातली गुंतागुंत आणि नैतिक-अनैतिकाच्या संकल्पनांमध्ये भरडल्या जाणाऱ्या आयुष्यांची ही आगळीवेगळी कहाणी. क्षमा ३२०/- पल्लवी, एक उच्चशिक्षित, हुशार, विवाहित आयटियन तरुणी... ऑफिसच्या कामाच्या निमित्ताने ती अमेरिकेला जाते आणि अनपेक्षितपणे तिच्यासमोर उभा ठाकतो चेतन (चेतू), तिचा शाळूसोबती. चेतूचं आणि तिचं परस्परांवर प्रेम असतं; पण काही कारणाने ते लग्न करू शकलेले नसतात. आता तिचं लग्न झाल्यानंतर बऱ्याच कालावधीने ते एकमेकांसमोर आलेत. अविवाहित असलेला चेतू अजूनही तिच्यावर तेवढंच प्रेम करतोय. तिच्या अमेरिकेतल्या मुक्कामात ते परस्परांवर प्रेमाची मुक्त उधळण करतात, अर्थात मर्यादा सांभाळून; चेतू तर तिच्याशी लग्न करायलाही तयार असतो; पण ती संसार आणि प्रेम या द्वंद्वात सापडते. शेवटी ती असा निर्णय घेते की चेतूपासून मूल होऊ द्यायचं आणि ते मूल त्यांच्या प्रेमाची निशाणी असेल. तिच्या वडिलांच्या विवाहबाह्य संबंधांमुळे तिच्या आईने आत्महत्या केलीय. ती वडिलांना क्षमा करू शकलेली नाही. या पार्श्वभूमीवर ती तिच्या निर्णयाची अंमलबजावणी करते का? भावांदोलनांनी सजलेली व्यामिश्र कादंबरी. कशीर ४२५/ काश्मिरच्या धगधगत्या होमकुंडाला कथात्म साहित्यात गुंफत ही कादंबरी देशातला एक महत्त्वाचा विषय कुशलतेने हाताळते. एके काळी भारतीय संस्कृतीचं समृद्ध स्थळ असलेलं काश्मीर तेजोहीन होऊन आज म्लेछ धर्मापुढे का शरणागत झालं आहे, या तपशिलाचा शोध ही कादंबरी घेते. बशीर अहमद, त्यांचा मुलगा अन्वर, ड्रायव्हर सलीम यांसारखी धर्माच्या सीमा ओलांडून पाहणारी पात्रं, पुरातन वेदान्तात आजच्या समस्येवरचं उत्तर शोधणारे हृदयनाथ पंडित; काश्मीर सोडून जम्मूला आलेल्या बांधवांना लुटणारे हिंदू घरमालक, अशा अमानवी परिस्थितीत दांपत्य-जीवनाची फरफट होत असतानाही दांपत्य-जीवनातलं मूल्य जपणारे संजीव आणि आरती कौर अशा पात्रांच्या माध्यमातून काश्मीर नव्याने समजत जातो.

Pickup currently not available