{"product_id":"pravasayan-by-narayan-tak","title":"Pravasayan | प्रवासायन By Narayan Tak | नारायण टाक","description":"\u003cp\u003e'प्रवासायन : निसर्ग, कला आणि संस्कृतीची अनुभूती' हे केवळ एक प्रवासवर्णन नाही, तर भारतवर्षाच्या अथांग निसर्गाचा, प्राचीन कलेचा आणि समृद्ध संस्कृतीचा जिवंत अनुभव आहे. शब्द आणि रेषाचित्रांच्या माध्यमातून तो सुंदरपणे साकारला आहे! लेखकाच्या सिद्धहस्त लेखणीतून आणि त्यांच्याच हाताने साकारलेल्या वैशिष्ट्यपूर्ण रेखाचित्रांमधून उलगडत जाणारी ही कलात्मक प्रवासगाथा आहे. पुस्तकातील लेखन चित्रदर्शी आहे, वाचताना आपण स्वता लेखकासोबत प्रवास करत आहोत, असा प्रत्यक्ष अनुभव येतो.\u003cbr\u003eया प्रवासाची सुरुवात काश्मीरच्या दल सरोवरापासून होते. रोहतांगच्या रुपेरी बर्फाच्छादित गिरिशिखरांपासून मनाली-खज्जीयारमार्गे हा प्रवास पुढे जातो; दक्षिण भारतात जाताना बंदीपूरच्या जंगलातील धरार अनुभवतो, मुन्नार अलप्पुझाच्या देखण्या निसर्गसौंदर्याचे दर्शन घडवितो. याशिवाय बदामी, ऐहोळे, पट्टयकल, लेपाक्षी व श्रीरंगम येथील अद्भुत पाभाणशिल्पे आणि भव्य स्थापत्यकलेच्या ऐतिहासिक वैभवाकडे घेऊन जातो. शेवटी पश्चिमेकडील सिंधू संस्कृतीचे वैभव असलेल्या 'लोथल'च्या प्राचीन बंदरापर्यंत पोहोचतो, प्राचीन काळातील पहिले प्रजासत्ताक असलेल्या 'वैशाली' नगरीत जातो आणि नंतर ईशान्येतील काझीरंगाच्या जंगलातील प्राण्यांचे, एकशिंगी गेंडचांचे अरण्यनाट्च अनुभवतो.\u003cbr\u003eभारताच्या विविधतेने नटलेला हा संपूर्ण प्रवास वाचकांना धक्क करून सोडती. निसर्गप्रेमी, इतिहासप्रेमी, कलाप्रेमी आणि पर्यटक यांना एकाच वेळी आनंद देणारा हा एक अभूतपूर्व ग्रंथ आहे. प्रवासातून घडणारी ही अनुभूती प्रत्येक वाचकाला समृद्ध करेल आणि भारताच्या गौरवशाली वारशाची एक नवी दृष्टी देईल, यात शंका नाही.\u003c\/p\u003e","brand":"Vishwakarma Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":67715837460563,"sku":null,"price":330.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/71AmQiThumL._SL1004.jpg?v=1792142816","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/pravasayan-by-narayan-tak","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}