प्रस्तुत पुस्तकात लेखक डॉ. मोरे यांनी भगवान श्रीकृष्णबद्दलची बहुसंख्य वाचकांना अज्ञात असलेली अथवा दुर्लक्षीत झालेली माहिती, भगवान कृष्णांच्या जीवनातील घटनाप्रसंग सांगितले आहे. यामुळे ज्ञानवृद्धी होण्याबरोबरच आकलनाचा परीघही रुंदावतो. घटना प्रसंगाकडे पाहण्याची दृष्टी विकसित होते. त्या त्या घटना प्रसंगातून दिसून येणार्या श्रीकृष्णाच्या व्यक्तिमत्त्वाच्या पैलूंनी आश्चर्यचकित व्हायला होते. श्रीकृृष्णाबद्दलचा आदरभाव नव्या अर्थाने वृद्धिंगत होतो. कृष्णचरित्र केवळ सांप्रतकालीन संदर्भात समजून घेण्यापेक्षा ते तत्कालीन सामाजिक, धार्मिक परिप्रेक्ष्यातून समजून घेण्याची गरज हे पुस्तक अधोरेखित करते. श्रीकृष्णाचे अलक्षित, अपरिचित व्यक्तित्त्व हे पुस्तक निदर्शनास आणते. महाभारत रामायणादी घटना प्रसंगांवर पुष्कळच लेखक लिहित आले आहेत. तथापि, हे पुस्तक लेखकाच्या स्वचिंतनाचे प्रतिबिंब उमटवते. वाचकांना प्रेरणा मिळून त्यांचा जीवनस्तर उंचावणार्या निखळ भूमिकेतून प्रा. डॉ. बी.सी. मोरे यांनी हा ग्रंथप्रपंच केला आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours