Skip to product information
Priya Suhas Shirvalkar |(प्रिय सुहास शिरवळकर) By Sunil Pande|सुनील पांडे
Rs. 100.00
Pages: 64
Language: Marathi
Overview:
एक प्रवाही आणि सहज शब्दकळा सुनील पांडे यांना लाभलेली आहे. 'सुशिं'च्या वाचकप्रिय कादंबऱ्यांचे अनेक संदर्भ देत देत ते आपल्या ह्या आवडत्या लेखकाशी संवाद साधत आहेत. कोणताही संवाद हा कधीही एकतर्फी नसतो. संवाद हा नेहमी दोन्ही बाजूंनी असतो. ह्या साहित्यकृतीमध्ये सुनील पांडे हे आपलं मनोगत प्रकट करीत असताना दुसऱ्या बाजूला 'सुशि'देखील त्यांना प्रतिसाद देत असावेत, असा भास होतो. भास का असेना, पण तो होतो, महत्त्वाचे आहे. पांडे यांच्या लेखनातच ही संवाद साधण्याची गुणवत्ता आहे. आपल्या अत्यंत आवडत्या लेखकाशी, ते ह्या जगात नसताना, एका अस्वस्थ मनानं संवाद साधावा असं वाटणं हा प्रतिभेचा एक अनोखा पैलूच आहे. ह्या मनोगतात सुहास शिरवळकर यांच्या जगण्याचे अनेक पदर उलगडतात. सुशि आणि त्यांना त्यांच्या सगळ्या सुख-दुःखात साथ देणाऱ्या त्यांच्या सहधर्मचारिणी सुगंधाताई यांच्याही विलक्षण जगण्यावर प्रकाश पडतो. निव्वळ लेखनावर जगणं भारतात कठीण ; मराठीत तर आणखीनच कठीण. पण सुशि हे आपल्या परीने आणि आपल्या जीवनशैलीने आपल्या दिमाखात जगत राहिले. त्यांच्या मन:पूत जगण्याचा हा एक प्रतिध्वनीच म्हणावा लागेल. -- श्रीराम ग. पचिंद्रे, कोल्हापूर

You May Also Like