Skip to product information
Pustake : Sad Ani Dad |पुस्तके : साद आणि दाद |Dr. Anurag Shrikant Lavekar|अनुराग श्रीकांत लव्हेकर
Sale price  Rs. 315.00 Regular price  Rs. 350.00
Pages: 224
Language: Marathi
Overview:
मराठी साहित्यात आता पुस्तकांवरची पुस्तके काढण्याची प्रथा मूळ धरू पाहत आहे, अशा पुस्तकांना वाचक, प्रकाशक मिळतात, ही फार आश्वासक बाब आहे. ‘पुस्तके : साद आणि दाद' हे पुस्तकही असाच साहित्यझरोका. या पुस्तकात इतिहास, वाङमय विचार, संस्कृती, प्रेरणा, निसर्ग, आरोग्य आणि समकालीन घडामोडींवर भाष्य करणाऱ्या वैचारिक पुस्तकांवरची आस्वादक समीक्षा आहे. 'The more I read, the more I acquire, the more certain I am that I know nothing' अशा शब्दांत समजेच्या मर्यादांना व्होल्टेअरसारख्या दिग्गजाने शब्दरूप दिले असेल, तर आपले वाचनप्रेम त्या तुलनेत अगदीच किरकोळ आहे, याची विनम्र जाणीव लेखकाला आहे. पुस्तकांची निवड आणि लेखकाची भाषाशैली यावरून लेखकावरील वाचनसंस्कारांचा प्रत्यय येतो. लेखक एखाद्या पुस्तकाची केवळ सुरुवात करत असतो, ते शेवटाला नेणे वाचकांच्या हातात असते, काहीशा या भावनेसह या पुस्तकाचे सुकाणू लेखकाने वाचकांच्या हाती सोपवले आहे.

You May Also Like