Skip to product information
Rajendra Barve Teen Pustkancha Sanch राजेंद्र बर्वे तीन पुस्तकांचा संच
Rs. 399.00
Pages: -
Language: Marathi
Overview:
आत्मविश्वासाकडे वाटचाल आत्मविश्वासाचा जन्म इच्छा आणि स्वप्नांच्या पोटी होत असतो. आपल्याला एखादं काम करण्याची इच्छा होते हे आत्मविश्वासाचे बीज असते. त्याला प्रयत्नाचं खतपाणी घातलं, त्याची प्रयोगशीलतेनं मशागत केली की प्रचंड वृक्षांत रूपांतर होतं.आपल्याला इतरांच्या आयुष्यातील असा डेरेदार वृक्ष दिसतो. आपण अचंबित होतो. आपल्याकडे असा वृक्ष का बरं बहरलेला नाही असं वाटतं. हेवा वाटतो पण त्या मागची मेहनत आपल्याला दिसत नाही.अशी मेहनत करायची तयारी असूनदेखील काही वेळा आत्मविश्वास आढळत नाही. याचं कारण, आपण त्यासाठी कोणताच धोका पत्करायला तयार नसतो. कोणतीही ‘रिस्क’ न घेता भरपूर यश कमावता आलं पाहिजे. असं आपल्याला वाटतं. पण रिस्क घेतल्याशिवाय कसं काय यश मिळणार? यश मिळाल्याशिवाय आत्मविश्वास तरी कसा वाढणार?आत्मविश्वास असल्याशिवाय रिस्क तरी कशी घेणार? सवयीचे गुलाम शरीराला आणि मनाला सवयी का व कशा लागतात त्यामागील शरीरक्रिया आणि मनोव्यापार कोणते नियमित आहार आणि निद्रा, व्यायाम आणि सकाळचा प्रसन्न उत्साह या सवयींतून प्रकृती.. गैरशिस्त, अव्यवस्थितपणा, व्यसनं आणि भयभीतता या सवयमधून विकृती... आणि वक्तशीरपणा, वागण्या-बोलण्यातील आदब आणि सभ्यपणा या सवयींतून संस्कृती व्यक्त होते. आपल्याला वाटचाल करायची आहे विकृतीकडून... संस्कृतीकडे !वाईट सवयीमधून सुटका हा फक्त एका क्षणाचा प्रश्न असतो. नकळत घडणाऱ्या चुकीच्या कृतीला टाळायचं असल्यास एखादा क्षणही पुरेसा असतो. तो क्षण असतो तल्लख आत्मभान बाळगण्याचा. तो क्षण असतो मोहातून स्वत:ला सोडविण्याचा. तो क्षण असतो एखाद्या दीर्घ श्वासाकरता त्या दीर्घ श्वासानं मनात सुविचाराला जागा मिळते. त्या दीर्घ श्वासानं क्षणकाल डोळे मिटून आपण मनात तटस्थ भाव जागृत करतो. त्या दीर्घ श्वासानं मनातील मोह, भीती, काळजी आणि धास्ती मिटते. त्या दीर्घ श्वासानं मनाला हुरूप येतो. मनातील आत्मविश्वास खडबडून जागा होतो भयगंड तुमचे उत्तर माझे : भीतिमुक्त जगण्यासाठी  भयगंड, औदासीन्य किंवा चिंताग्रस्तता अथवा छिन्नमनस्कता ह्या केवळ विकारग्रस्त मनोवस्था आहेत,ते आजार आहेत. जसा हृदयाला, मूत्रपिंडाला, जठराला या विविध अवयवांनाविकार तसाच मन या संस्थेला विकार जडतो. मन या संस्थेचा अवयव ‘मेंदू’! म्हणजे मेंदूच्या क्रियापद्धतीमध्ये बिघाड झाला तर मानसिक अस्वस्थता, बेचैनी अगर चिंतेचा झटका येऊ शकतो. हे निर्विवादपणे शास्त्रसंमत झाले  आहे.याच निखळ शास्त्रीय व मनोवैज्ञानिक विचारांचा प्रस्तुत पुस्तकामध्ये पाठपुरावा केलेला आहे.

You May Also Like