{"product_id":"rama-bhag-1-राम-भाग-१-by-rajendra-khare-राजेंद्र-खेर","title":"Rama Bhag 1 | राम भाग १ By Rajendra Khare | राजेंद्र खेर","description":"\u003cp\u003eअखेर ते युद्ध छेडलं गेलं होतं आणि रामानं आपला अद्भुत पराक्रम दाखवून दिला होता. पुढच्या दीड मुहूर्तामध्ये एकट्या रामानं चौदा सहख राक्षसांचा वध केला! युद्ध थांबलं तेव्हा सर्वत्र राक्षसांच्या शरीराचे तुटके अवयव, मोडके रथ, विविध निकामी शखं, आभूषणं, तुटके सुवर्णध्वज यांचा खच पडला होता. रामानं एकट्यानं त्या सहस्रो बलाढ्य राक्षसांचा निःपात केलेला पाहून ऋषिसमुदायानं त्याच्या नावाचा जयजयकार आरंभला.\u003cbr\u003eपण या युद्धाचे काय परिणाम होणार होते? कोणतं नाट्य पुढे घडणार होतं? राजनीतीचे धागेदोरे कसे विणले जाणार होते? भारतवर्षातल्या राजकारणाला त्यामुळे कोणतं वळण मिळणार होतं? कुणाकुणावर आपत्ती ओढवणार होती? कुणाकुणाचा बळी जाणार होता? कुणाची सत्त्वपरीक्षा घेतली जाणार होती?\u003cbr\u003eवाल्मीकी रामायणात वर्णन केलेले अनेक प्रसंग आज कल्पित वाटू शकतात. परंतु रामायण हे कल्पित काव्य नसून, तो आपल्या भारताचा सहस्रो वर्षापूर्वी घडून गेलेला दैदिप्यमान इतिहास आहे. रामजन्म, कर्षीचं कार्य, इंद्राचं स्वरूप आणि कार्य, गृध्र जटायूचं वास्तविक स्वरूप, वानरांची वास्तविकता, पुष्पक विमानाचं स्वरूप, रावणाचं साम्राज्य, दक्षिण अमेरिकेपासून भारताच्या पूर्वेकडच्या देशांपर्यंत घडलेलं राजकारण, आदी गोष्टी-घटना आजच्या शोधांशी ताडून बघितल्या तर आपण पाषाण किंवा ताम्रयुगातला इतिहास वाचत नसून अत्यंत प्रगत संस्कृतीविषयक इतिहास वाचतो आहोत याचा अनुभव वाचकांना मिळेल.\u003c\/p\u003e","brand":"हेडविग मीडिया हाऊस | Hedwig Media House","offers":[{"title":"Default Title","offer_id":46365030285395,"sku":null,"price":405.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/dcos_a8cc1c1b-ba6f-441f-8c8c-7e97ddb0d0b3.jpg?v=1789721683","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/rama-bhag-1-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%ae-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-%e0%a5%a7-by-rajendra-khare-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%96%e0%a5%87%e0%a4%b0","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}