{"product_id":"ramalo-mi","title":"रमलो मी | Ramalo mi","description":"\u003cp\u003eजसजसा वयाचा काटा पुढं पुढं सरकतो. तसतशा जुन्या आठवणी. जुन दिवस, प्रसंग, मित्रपरिवार मनात गर्दी करू लागतात. ‘कुठून, केव्हा, कशी सुरुवात झाली आणि आज तू कुठवर आला आहेस?’ याचा स्वत:साठी का होईना.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eताळेबंद मांडावासा वाटतो. माझं स्वत:चं आयुष्य फार काही सरळ रेषेत, नाकासमोरच्या रस्त्यानं गेलेलं नाही. कला, साहित्य, शिक्षण, समाजकारण अशा आवडीच्या क्षेत्रांत मुक्तपणे वावरणारा मी कोणी एक ‘अमकातमका’! मधल्या फळीतला खेळाडू. खेळाचा मनमुराद आनंद घेत हार-जितीची पर्वा न करता, असेल त्या मैदानावर खेळ करणारा सीधासाधा खेळीया.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eआयुष्याच्या ओबडधोबड वाटांवरून चालताना अनेक व्यक्तिंचा जिव्हाळा, स्नेह मला लाभला. अनेकांनी माझ्या इवल्या पंखांना आकाशात उडण्याची प्रेरणा दिली, शक्ती दिली. माझं आयुष्य श्रीमंत, समृद्ध केलं; त्याचीच ही रामकथा! जेथे जेथे गेलो जमविले आप्त खेळुनिया मुक्त रमलो मी -श्रीराम रानडे हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270322417747,"sku":null,"price":203.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Ramlo-Mi.jpg?v=1759041948","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/ramalo-mi","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}