रामायण कथासार २४,००० श्लोकांचा सारांश एकाच पुस्तकात संपूर्ण रामायणाचा अनुभव तुमच्या हातात ! रामायण हा आपला राष्ट्रीय ग्रंथ आहे. समायणातील सर्व व्यक्ती आदर्श असल्या तरी त्या संपूर्ण मानवी आहेत. त्यांच्या भावभावना सर्वसामान्य माणसांच्या भावनांशी समरस होणाच्या आहेत. म्हणूनच 24000 श्लोकांचे महाकाव्य हजारो वर्षे टिकले आहे.
आणि जनमानसावर आपले अधिराज्य गाजवत आहे. या रामायण कथासार पुस्तकाचे मूळ नाव प्रथम श्रीराम चरीत्र असे होते. प्रसिद्ध नेते व हायकोर्ट न्यायाधीश चिंतामणराव वैद्य यांनी ते लिहीले होते. मूळच्या चोवीस हजार श्लोकांचे रामायण कथासार मध्ये उत्तम प्रकारे काढलेले एकत्र सारच आहे. उदाहरणार्थ युद्धकांडाच्या शेवटी सर्ग 130 पर्यंतचा सारांश आहे असा उल्लेख आहे. श्रीराम कसा होता ?
हे एका श्लोकात पहायला मिळते. हे जरी कथासार असले तरी मुळातील सर्व प्रसंग व घटना येथे दिलेल्याच आहेत. म्हणजे हे कथासार वाचून मूळ संपूर्ण रामायण वाचल्याचे श्रेय तुमच्या पदरात सहज पडणार आहे. श्री रामायण दूरदर्शनवर मालिकेच्या रूपात पुन्हा-पुन्हा येत आहे. तरीही पुस्तक वाचल्याशिवाय मूळ रामायणाची गोडी समजणार नाही त्याकरिता प्रत्येक मराठी घरात हे रामायण कथासार असलेच पाहिजे.रामायणाचा संक्षिप्त पण संपूर्ण प्रवास – एक पुस्तक, अख्खं महाकाव्य. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours