दत्तानंद श्रीपाद चंदावरकर शिक्षण- बी. ए. (ऑनर्स), एल्. एल्. बी., सी. ए. आय आय बी. व्यवसाय - निवृत्त बँक मॅनेजर हे पुस्तक म्हणजे माझ्या ज्ञात व अज्ञात वाचकांशी साधलेला एक प्रेमळ संवाद आहे. माणसे जोडत रहावीत व त्यांच्याशी हसतखेळत संवाद साधावा हा माझ्या लहानपणापासूनचा छंद. बँकेत अनेक ठिकाणी केलेल्या नोकरीमुळे माझ्या अंगच्या सुप्त गुणांना वाव मिळाला. ह्या पुस्तकाचे मराठी व इंग्रजी असे दोन भाग आहेत. पैकी मराठी 'रम्य आठवणी'. ह्यामध्ये मला आलेले वेगवेगळे अनुभव, मला भेटलेल्या अनेक व्यक्ती ह्यांविषयी विस्तृत आठवणी मी दिलेल्या आहेत. इंग्रजी भाग Reminiscene ( रेमिनिसन्स) ह्यात मला बँकेत नोकरी करताना आलेले वेगवेगळे अनुभव - ज्यायोगे माझी सर्वांगीण उन्नती झाली व मी कटाक्षाने पाळलेल्या मूल्यांमुळे मला समाजात फार आदराचे स्थान मिळाले. निवृत्तीनंतरच्या आयुष्यांत मी एका नव्या जीवनाची सुरुवात केली आहे. त्यापैकीच हा एक प्रयत्न.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours