{"product_id":"ranjai","title":"रानजाई | Ranjai","description":"\u003cp\u003eसंजय लोहकरे यांच्या 'राव' या कथासंग्रहातील राव ही शीर्षक कथा या कादंबरीचे कथाबीज आहे. ही कादंबरी म्हणजे धरणग्रस्त म्हणून विस्थापित झालेल्यांच्या जखमांची वेदना आहे. - प्रा. रामदास गिळंदे केंद्रीय जल आयोगाच्या आकडेवारीनुसार भारतात ३६०० मोठी धरणे आहेत. आणि अजून ३९५ नवी धरणे बांधण्याची सरकारची तयारी आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक एडमिनिस्ट्रेशनच्या अभ्यासानुसार या धरणांमुळे विस्थापित होणाऱ्या लोकांची संख्या पाच कोटी इतकी आहे. त्यात ६०% आदिवासी समूह आहेत. - रोहिदास डगळे, राज्य वन्यजीव मंडळ सदस्य, महाराष्ट्र जेव्हा लोकांना धरणग्रस्त म्हणून विस्थापित केलं जातं, तेव्हा सरकार त्यांचं पुनर्वसन करतं का? त्यांना घर, जमीन, पाणी, आरोग्य, शिक्षण, नोकरी हे मानवी हक्क सरकारच्या पुनर्वसन कायद्यात आहेत. पण त्या विस्थापित लोकांचं तिथल्या भूमीशी, जंगलाशी असलेलं नातं, तिथल्या सजीवसृष्टीशी एकरूप झालेलं जीवन, त्यांच्या परंपरा, देवीदेवता आणि भाषा यांचं पुनर्वसन होतं का? विस्थापित झालेल्यांच्या अशा मूलभूत प्रश्नांना आणि सरकारच्या अमानवी धोरणांना मुखर करणारी ही कादंबरी आहे. ती मानवतेची हाक मारणाऱ्यांच्या बाजूने उभी राहते. स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर इथल्या हुकूमशाही व्यवस्थांनी आपल्या स्वार्थासाठी आदिवासींचं स्वतंत्र आणि नैसर्गिक जीवन उद्ध्वस्त करू पाहणाऱ्यांचा धिक्कार करते.\u003c\/p\u003e","brand":"Atharva Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":68281407045715,"sku":"9.78936E+12","price":169.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Ranjai_20front.jpg?v=1795505301","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/ranjai","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}